मुंबई : राम मंदिराच्या उद्घाटनाआधी देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या 22 जानेवारीला राम मंंदिराचं उद्घाटन पार पडणार आहे. देशभरातील विविध क्षेत्रांमधील दिग्गजांना निमंत्रण देण्यात येत आहे. अशातच क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकराही या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. ANI ने ट्विट (एक्स) करत माहिती दिली आहे.
Former Indian Cricketer Sachin Tendulkar receives an invitation to attend the ‘Pran Pratishtha’ ceremony of Ram Temple on January 22nd in Ayodhya, Uttar Pradesh. pic.twitter.com/W8bhR8lOMv
— ANI (@ANI) January 13, 2024
विश्व हिंदू परिषदेने याआधी रोहित शर्मा विराट कोहली यांना आमंत्रण दिलं होतं. आता सचिन तेंडुलकर हा तिसरा क्रिकेटर ठरला आहे ज्याला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रण दिलं गेलं आहे. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमाला राजकीय नेते, खेळाडू आणि सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी, चित्रपट स्टार अमिताभ बच्चन, रतन टाटा यांसारख्या देशभरातील अनेक हाय प्रोफाईल नावांना आमंत्रित करण्यात आले आहे. या यादीत भारताचा स्टार क्रिकेटर रोहित शर्माचा आणि विराट कोहलीचाही समावेश आहे.
दरम्यान, 22 जानेवारीला रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. देशातील मान्यवरांना पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. सोहळ्याच आमंत्रण दिलं नसल्याने राजकीय वर्तुळातून भाजपवर टीका केली जात आहे. महाराष्ट्रातीलही विरोधकांमधील प्रमुख नेत्यांना अद्याप आमंत्रण दिलं गेलं नाही.