Vinod Kambli : रुग्णालयाचा खर्च, घराचा हफ्ता विनोद कांबळीकडे एवढे पैसे कुठून येतात? सचिनची ती गोष्ट पहिल्यांदाच आली समोर

विनोद कांबळी सध्या प्रचंड हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगत आहे, तो अनेक आजारांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याचा सर्व खर्च कोण करत असा प्रश्न आता समोर येत आहे.

Vinod Kambli : रुग्णालयाचा खर्च, घराचा हफ्ता विनोद कांबळीकडे एवढे पैसे कुठून येतात? सचिनची ती गोष्ट पहिल्यांदाच आली समोर
Follow us
| Updated on: Dec 16, 2024 | 6:47 PM

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि माजी क्रिकेटर विनोद कांबळी हे दोघं लहाणपणापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र एकीकडे सचिनने क्रिकेट क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, क्रिकेटचे अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करत एक नवा कीर्तिमान निर्माण केला, तर दुसरीकडे विनोद कांबळी मात्र सध्या प्रचंड हालाखीच्या परिस्थितीमध्ये जगत आहे, तसेच त्याला विविध आजारांनी देखील ग्रासलं आहे. 52 वर्षीय विनोद कांबळी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहे. त्याला नीट चालता देखील येत नाहीये, अशा कठीण परिस्थितीमध्ये त्याच्याकडे उत्पन्नाचं साधन देखील नाहीये.

तो सध्या बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शवर अवलंबून आहे. त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होतो की त्याच्या उपचाराचा खर्च कोण करतं? अशी देखील बातमी आहे की त्याने गृह कर्ज देखील घेतलेलं आहे. मात्र जाणून घेऊयात नेमकी खरी परिस्थिती काय आहे ती.

विनोद कांबळी सध्या प्रचंड हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगत आहे, तो अनेक आजारांचा सामना करत आहे. अशा परिस्थितीमध्ये एक दिलासादायक बातमी म्हणजे त्याचं कुटुंब त्याच्यासोबत आहे. विनोद कांबळी हा मुंबईमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहातो. त्याच्या कुटुंबात पत्नी एंड्रिया हेविट एक मुलगा आणि मुलगी आहे. अशाही बिकट परिस्थितीमध्ये कांबळीच्या पत्नीनं त्याची साथ सोडली नसून ती अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची काळजी घेत आहे. कांबळीला जेव्हा जेव्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं जातं तेव्हा तेव्हा त्याची पत्नी त्याच्यासोबत असते.

एक वेळी अशी होती की विनोद कांबळी हा करोडो रुपयांच्या संपत्तीचा मालक होता.तो अलिशान जीवन जगत होता. मात्र आता त्याच्यावर अशी वेळ आली आहे की,त्याच्याकडे त्याच्या उपचारासाठी देखील पैसे नाहीयेत. मग असा प्रश्न निर्माण होतो की त्याचा खर्च कसा भगतो? या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे, की कांबळीचा सर्व खर्च हे त्याचे मित्र करता, त्यामध्ये सचिनचा देखील मोठा वाटा आहे. मीडिया रिपोर्टनुसार अजूनही सचिन तेंडुलकर हा कांबळीला वेळोवेळी मदत करतो. तसेच कांबळीला बीसीसीआयकडून देखील पेन्शन मिळते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.