Sachin Tendulkar : टीम इंडियाच्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरने रोहित-द्रविडची दाखवून दिली सर्वात मोठी चूक, म्हणाला….
India Lose WTC Final : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याने कांगारूंचं अभिनंदन करत टीम इंडियाचा पराभव कोणत्या कारणामुळे झाला हे सांगितलं आहे.
मुंबई : टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनल 2023 मध्ये झालेला पराभव सर्वांच्या जिव्हारी लागला आहे. सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश करून पराभवाचा सामना करावा लागल्याने हा पराभव मनाला खात आहे. ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव करत पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीप जिंकत आयसीसीच्या सर्व ट्रॉफीवर नाव कोरण्याचा पराक्रम केला आहे. अशातच क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याने कांगारूंचं अभिनंदन करत टीम इंडियाचा पराभव कोणत्या कारणामुळे झाला हे सांगितलं आहे.
काय म्हणाला सचिन तेंडुलकर?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये जिंकलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचं अभिनंदन करत स्मिथ आणि हेड यांनी पहिल्या दिवशीच क्कम पाया तयार केला. खेळात टिकून राहण्यासाठी टीम इंडियाने पहिल्या डावात चांगली फलंदाजी करायला हवी होती. मात्र त्यांना यश आलं नाही. महत्त्वाचं म्हणजे प्लेइंग इलेव्हनमधून अश्विनला वगळणे मला समजू शकले नाही, जो सध्या जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज आहे.
मी आधीपण म्हणालो होता, अश्विनसारखा गोलंदाज पूर्णपणे खेळपट्टीवर अवलंबून राहत नाहीत. त्याने आपल्या स्कीलच्या जोरावर अनेक विकेट घेतल्यात हे विसरून चालणार नाहीत. तसं पाहायला गेलं तर, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या 8 फलंदाजांपैकी 5 डावखुरे होते त्यामुळे ऑफ स्पीनरचा इम्पॅक्ट पडला असता, असंही सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.
Congratulations to Team Australia on winning the #WTCFinal. @stevesmith49 and @travishead34 set a solid foundation on Day one itself to tilt the game in their favour. India had to bat big in the first innings to stay in the game, but they couldn’t. There were some good moments…
— Sachin Tendulkar (@sachin_rt) June 11, 2023
WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.