‘वॉर्नी तुझी खूप आठवण येईल…’ Shane Warne च्या निधनाने सचिन तेंडुलकर भावूक

माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या (Shane Warne) निधनानंतर त्याचा क्रिकेटच्या मैदानातील प्रतिस्पर्धी आणि जवळचा मित्र असलेल्या दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) दुःख व्यक्त केलं आहे. ऑस्ट्रेलियन स्पिनरच्या निधनावर त्याने ट्विट करून प्रतिक्रिया दिली.

'वॉर्नी तुझी खूप आठवण येईल...' Shane Warne च्या निधनाने सचिन तेंडुलकर भावूक
Shane Warne - Sachin TendulkarImage Credit source: Sachin Tendulkar Twitter
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 10:30 PM

मुंबई : माजी फिरकीपटू शेन वॉर्नच्या (Shane Warne) निधनानंतर त्याचा क्रिकेटच्या मैदानातील प्रतिस्पर्धी आणि जवळचा मित्र असलेल्या दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) दुःख व्यक्त केलं आहे. ऑस्ट्रेलियन स्पिनरच्या निधनावर त्याने ट्विट करून प्रतिक्रिया दिली. सचिन आणि शेन वॉर्नची कारकीर्द तीन वर्षांच्या अंतराने सुरू झाली. पण दोघांमध्ये जोरदार स्पर्धा होती. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूवर भारतीय फलंदाजांचा बहुतांश वेळ वरचष्मा होता. शेन वॉर्नचे 4 मार्च रोजी वयाच्या 52 व्या वर्षी निधन (Shane Warne Passes Away) झाले. सुट्टीसाठी तो थायलंडला गेला होता. हृदयविकाराच्या झटक्याने तिथेच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. त्याच्या टीमने ही माहिती दिली.

महान फिरकी गोलंदाजांपैकी एक असलेल्या शेन वॉर्नच्या निधनावर सचिन तेंडुलकर म्हणाला की, तुझी आठवण येईल. भारत आणि भारतीयांसाठी तुझ्या हृदयात विशेष स्थान होते. सचिनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, धक्कादायक, स्तब्ध आणि दुःखी…, आम्हाला तुझी खूप आठवण येईल वॉर्नी, जेव्हा तू मैदानात किंवा मैदानाबाहेरही असायचास तेव्हा कधीच कोणताही क्षण कंटाळवाणा वाटायचा नाही. मैदानावरील आपली स्पर्धा आणि मैदानाबाहेरचे आपले विनोद मला नेहमीच आठवतील. तुझ्या मनात भारतासाठी नेहमीच खास स्थान होते आणि भारतीयांनी तुला त्यांच्या हृदयात स्थान दिले आहे.

कर्णधार बनण्याचं स्वप्न

शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी 2007 मध्ये त्याने सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. 1992 मध्ये पदार्पण करणारा वॉर्न 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधारही बनला, पण त्याला कर्णधार होण्याची संधी कधीच मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर, वॉर्नने प्रथमच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाचे नेतृत्व केले आणि पहिल्याच सत्रात राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनवले.

वॉर्नची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

शेन वॉर्नने 2007 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याच्या मागे दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण केल्यापासून 145 कसोटी सामने खेळले आणि त्यात 708 बळी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 293 बळी घेतले आहेत. तो 1999 च्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाचा सदस्य होता.

इतर बातम्या

Shane Warne चं स्वप्न, जे ऑस्ट्रेलियाला जमलं नाही ते भारताने पूर्ण केलं

Shane Warne : फक्त गोलंदाजीच नाही तर यामुळेही चांगलाच चर्चेत आला होता शेन वॉर्न

Shane Warne : शेन वॉर्न अनकेदा अडकलेला वादाच्या भोवऱ्यात, दिग्गज फिरकीपटू ठरलेला वादग्रस्त

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.