World Cup 2023 : क्रिकेटच्या देवाची भविष्यवाणी, ‘या’ चार टीम यंदाच्या वर्ल्ड कप सेमी फायनल खेळणार!

World Cup 2023 : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा भारताचा माजी दिग्गज खेळाडूने सचिन तेंडुलकर याने सेमी फायनलमधील चार संघांबाबत भविष्यवाणी केलीये. सचिनने यामध्ये एका वर्ल्ड कप विजेत्या संघाला स्थान दिलं नाही.

World Cup 2023 : क्रिकेटच्या देवाची भविष्यवाणी, 'या' चार टीम यंदाच्या वर्ल्ड कप सेमी फायनल खेळणार!
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 4:35 PM

मुंबई :  वर्ल्ड कप 2023 च्या थराराला सुरूवात झाली असून पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाने गतविजेत्या इंग्लंड संघावर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. इंग्लंड संघावर भारतीय वंशाचा किवींचा युवा खेळाडू भारी पडलेला दिसला. रचिन रवींद्रने शतकी खेळी करत सामना न्यूझीलंडच्या पारड्यात झुकवला. पहिल्या सामन्यातच न्यूझीलंड संघाने आपली ताकद दाखवून दिली आहे. वर्ल्ड कपमध्ये कोणते संघ सेमी फायनलध्ये प्रवेश करतील याबाबत अनेक आजी-माजी खेळाडूंनी भविष्यवाणी केली होती. आता क्रिकेटच्या देवानेही सेमी फायनलपर्यंत जाणाऱ्या संघांची नावे सांगितली आहेत.

ते चार संघ कोणते?

सचिन तेंडुलकर याच्या मते भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करतील. आताचा भारतीय संघ 2011 च्या इतिहासाची पुनरावृत्ती करेल असा विश्वास तेंडुलकरने व्यक्त केला. आताच भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये असून बेसिक गोष्टी फॉलो करायल्या हव्यात. संघाची फलंदाजी उत्तम असून गोलंदाजीसुद्धा मजबूत आहे. एकंदरित पाहता आताच संघ संतुलित असल्याचं तेंडुलकर म्हणाला.

सचिन तेंडुलकरने आपल्या चार संघांमध्ये पाकिस्ताला स्थान न दिल्याने सर्व क्रिकेट वर्तुळात त्याची चर्चा होताना दिसत आहे. अनेक माजी खेळाडूंनी टॉप 4 मध्ये पाकिस्तान संघाचा समावेश केला आहे. मात्र सचिनने पाकिस्तानच्या यंदाच्या सेमी फायनलमध्ये आपल्या संघात स्थान दिलं नाही. पाकिस्तानचा संघ पाहिला तर त्यांची बॉलिंग पहिल्यासारखी मजबूत राहिली नाही. याचं कारण म्हणजे हुकमी एक्का बाहेर गेलाय, तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून नसीम शाह आहे.

वर्ल्ड कप साठी भारतीय संघ:-

रोहित शर्मा (C), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (VC) , श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मो. सिराज, मोहम्मद शमी, अक्षर पटेल और शार्दुल ठाकुर

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.