Sachin Tendulkar: बेस्ट बससोबत सचिनच्या बेस्ट आठवणी! फोटो शेअर करत सचिनला बालपण आठवलं
Sachin Tendulkar in Best Bus: लवकरच सचिन तेंडुलकर बेस्ट बसच्या आपल्या आठवणी शेअर करणार आहे. या आठवणी नेमक्या कशा असतील याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे.
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं ट्विटरवर (Sachin Tendulkar shares photo) एक फोटो पोस्ट केला. डबलडेकर बसच्या (Double Decker Best Bus) दरवाजावर उभं राहत बसचा दरवाजावरील दांडा पकडून सचिन फोटोसाठी पोझ करतो आहे. निळं शर्ट, डार्क ब्लू जीन्समधला सचिनहा हा फोटो अनेकांचं लक्ष वेधून घेतो आहे. या फोटोसह सचिननं लिहिलेलं कॅप्शननंही तितकंच महत्त्वाचं. ‘रिवाईंड टू चाईल्डहूड’ असं सचिननं म्हटलंय. बालपणीच्या बसमधून केलेल्या आठवणी सचिनला पुन्हा एकदा यानिमित्तानं आठवल्या आहेत. मुंबईतल्या प्रत्येकासाठी बेस्ट बस म्हणजे दुसरी लाईफलाईनच (Life line of Mumbai) आहे. मुंबई लोकलनंतर मुंबईच कणा म्हणून बेस्ट बस सगळ्यांसाठी महत्त्वाची आहेच. याच बेस्ट बसचं सचिनच्या आयुष्यातही मोलाचं स्थान आहे. या फोटोच्या निमित्तानं सचिन आणि बेस्ट बसच्या आठवण्या नेमक्या काय आहेत, याची उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे.
बेस्टनं शेअर केला व्हिडीओ..
लवकरच सचिन तेंडुलकर बेस्ट बसच्या आपल्या आठवणी शेअर करणार आहे. या आठवणी नेमक्या कशा असतील याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. एका व्हिडीओ बेस्ट बस कॉर्पोरेशन कडून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सचिन जुन्या आठवणींमध्ये रमल्याचं दिसून आलंय.
पाहा व्हिडीओ :
#ComingSoon, @sachin_rt‘s story of moving forward in Mumbai’s BEST. #PudheChala pic.twitter.com/QWZAD3RCZw
— BEST Bus Transport (@myBESTBus) April 2, 2022
आपल्या शाळेच्या दिवसांत, कॉलेजच्या काळात सचिन तेंडुलकर एका सर्वसामान्य प्रवाशाप्रमाणेच मुंबईतल्या सार्वजनिक वाहतुकीमधून फिरला असेल. त्यानंही सर्वसामान्य प्रवाशासारखाच प्रवास केला असेल. पण त्याकाळी केलेला प्रवास सचिनला आता नेमका काय खुणावतोय, हे लवकरच स्पष्ट होईल.
315 नंबरची बस!
315 नंबरच्या एका डबलडेकर बसमध्ये नुकतंच सचिनचं शूटिंग पार पडलं. याच वेळी सचिननं काढलेला फोटो ट्वीटरवरुन शेअर केला आहे.
कुठून कुठे जाते 315?
सचिननं काढलेल्या फोटोमध्ये 315 नंबरची बस राम गणेश गडकरी चौक शिवाजी पार्क या ठिकाणची असल्याचं दिसतंय. पण सध्यातरी ही 315 नंबरची बस सांताक्रूझ ईस्ट ते प्रतिक्षा नगर या मार्गावर चालते. एकूण 38 बस स्टॉप या मार्गावर या बसला आहेत. 16.3 किलोमीटर अंतर या बसच्या मार्गात असून या डबलडेकर बससोबत सचिन आता नेमक्या कोणत्या आठवणी शेअर करणार, याची आतुरता सगळ्यांना लागली आहे.
⏪ Rewind to childhood ⏪ pic.twitter.com/coWn58hGiH
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 4, 2022
क्रीडा क्षेत्रातील इतर बातम्या:
क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये मैदान गाजवणार, Jos buttler ची भारतीय गोलंदाजाबद्दल भविष्यवाणी
IPL 2022 play of venues: ‘या’ दोन शहरात होणार प्लेऑफचे सामने, BCCI ने केली प्लानिंग
IPL 2022: Mumbai Indians ने आपल्याच पायावर कुऱ्हाड मारली, ज्याला सोडलं, त्यानेच घातला धुमाकूळ