Video : शतकी खेळी आणि जबरदस्त फॉर्म तरी टीम इंडियातून बाहेर, इंग्लंडमध्ये षटकार ठोकत केली सेंच्युरी

भारताच्या युवा खेळाडूने इंग्लंडमध्ये आपल्या फलंदाजीतून पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. काउंटी चॅम्पियनशिपमध्ये सर्रेसाठी खेळताना सेंच्युरी ठोकली आहे. विशेष म्हणजे सहाव्या स्थानावर फलंदाजी करताना त्याने शतक ठोकलं आहे.

Video : शतकी खेळी आणि जबरदस्त फॉर्म तरी टीम इंडियातून बाहेर, इंग्लंडमध्ये षटकार ठोकत केली सेंच्युरी
Image Credit source: (PC-Ben Hoskins/Getty Images for Surrey CCC)
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 9:35 PM

भारतीय संघात स्थान मिळवणं आणि ते टिकवून ठेवणं आता वाटतं तितकं सोपं राहिलेलं नाही. कारण नवोदित खेळाडू आणि त्यांचा फॉर्म पाहता ही स्पर्धा तीव्र झाली आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण कामगिरी करण्याशिवाय पर्याय नाही. असंच काहीसं साई सुदर्शनच्या बाबतीत म्हणता येईल. साई सुदर्शनला टीम इंडियाचं भविष्य मानलं जातं. त्याच्या फलंदाजीची शैली पाहून दिग्गज खेळाडू स्तुती करताना थकत नाहीत. आता याच साई सुदर्शनने इंग्लंडच्या भूमीवर आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं आहे. काउंटी चॅम्पियनशिपसाठी साई सुदर्शन सर्रे संघाकडून खेळतो. नॉटिंगघमशरविरुद्धच्या सामन्यात साई सुदर्शने जबरदस्त खेळीचं दर्शन घडवलं. त्याने 105 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे सहाव्या स्थानावर उतरत त्याने 178 चेंडूंचा सामना केला आणि शतक ठोकलं. त्याच्या या खेळीमुळे सर्रेला पहिल्या डावात 525 धावा करता आल्या.

साई सुदर्शनने आपल्या शतकी खेळीत 10 चौकार आणि षटकार मारला. यात षटकार ठोकत त्याने आपलं शतक साजरं केलं हे विशेष. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याचं हे चौथं शतक आहे. साई सुदर्शनचं काउंटी क्रिकेटमध्ये हा पहिला सामना होता आणि पहिल्याच सामन्यात त्याने शतक ठोकलं. शतकी खेळी केल्यानंतर बाद झाला. पण सध्या फॉर्मात असल्याचं त्याने दाखवून दिलं आहे. साई सुदर्शन टीम इंडियासाठी खेळला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला संधी मिळाली होती. साई सुदर्शनने दोन सामन्यात दोन अर्धशतकं ठोकली. त्याने 63.50 च्या सरासरीने 127 धावा केल्या. पण असं असूनही त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला.

साई सुदर्शनची आयपीएल कारकिर्दही गाजली आहे. 2022 आयपीएलमध्ये त्याने पदार्पण केलं होतं. तीन आयपीएल स्पर्धांमध्ये साई सुदर्शन 25 सामने खेळला आहेत. यात त्याने एक शतक आणि 6 अर्धशतकांच्या जोरावर 1034 धावा केल्या आहेत. यात त्याचा स्ट्राईक रेट हा 139.17 चा राहिला आहे.  मेगा लिलावात त्याला गुजरात टायटन्स रिलीज केलं तर साई सुदर्शनला मोठी रक्कम मिळू शकते. पण गुजरात सोडणार की रिटेन करणार हा देखील प्रश्न आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.