Aaron Jones: सौरभ नेत्रावळकरच्या सहकाऱ्याला लॉटरी, आरोन जोन्स याचं नशीब फळफळलं
Aaron Jones CPL: यूएसएचा विस्फोटक फलंदाज आरोन जोन्स याचं नशिब फळफळलं आहे. आरोनने टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये झंझावाती खेळी केली होती. त्यानंतर आता आरोन एका टी 20 लीग स्पर्धेत खेळताना पाहायला मिळणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत यजमान यूएसए टीमने उल्लेखनीय कामगिरी केली. यूएसएने आयर्लंड आणि पाकिस्तान यासारख्या अनुभवी संघांवर विजय मिळवला होता. तसेच यूएसएने सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवलेला. यूएसए टीममधील काही खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करुन साऱ्या क्रिकेट विश्वाला आपली दखल घेण्यात भाग पाडली होती. मुळ मुंबईकर असलेल्या सौरभ नेत्रावळकर आणि विस्फोटक फलंदाज आरोन जॉन्स या दोघांनी दमदार कामगिरी केली. सौरभने टीम इंडिया विरुद्ध रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांना आऊट केलं. तसेच पाकिस्तान विरुद्ध सुपर ओव्हर टाकून विजय मिळवून दिला.
तर दुसऱ्या बाजूला आरोन जोन्स या विस्फोटक सलामीवीर फलंदाजाने टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात धमाका केला. आरोनने कॅनडा विरुद्ध विस्फोटक खेळी करुन विजय मिळवून दिला होता. आरोनला त्याच्या या कामगिरीचं रिटर्न गिफ्ट मिळालं आहे. सीपीएल स्पर्धेसाठी आरोनला संधी मिळाली आहे.
आरोन जोन्सला सीपीएल ड्राफ्टमध्ये सेंट लुसिया किंग्सने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. आरोनकडे बारबाडोसचं पासपोर्ट आहे. त्यामुळे जोन्स स्थानक खेळाडू म्हणून टीमसह जोडला गेला आहे. तसेच इतर खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे. जोन्सला संधी मिळाल्याने तो येत्या काही दिवसात हेन्रिक क्लासेन, फाफ डु प्लेसिस, अल्झारी जोसेफ यासारख्या स्टार खेळाडूंसह खेळताना दिसणार आहे.
आरोनची विस्फोटक खेळी
दरम्यान आरोनने कॅनडा विरुद्ध टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात विस्फोटक बॅटिंग केली होती. आरोनने 40 बॉलमध्ये 4 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने नाबाद 94 धावांचा खेळी केली होती. तसेच पाकिस्तान विरुद्ध 26 बॉलमध्ये 36 रन्स केल्या होत्या. यूएसएने पाकिस्तान विरुद्धचा हा सामना सुपर ओव्हरमध्ये जिंकला. आरोनने सुपर ओव्हरमध्ये 11 धावा केल्या होत्या. आरोनच्या खेळीच्या जोरावर यूएसएने हा सामना 5 धावांनी जिंकून उलटफेर केला होता. त्यामुळे आता आरोनकडून सीपीएल अर्थात कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतही तोडफोड बॅटिंगी चाहत्यांना अपेक्षा असणार आहे.
आरोन जोन्स सेंट लूसिया किंग्ससह करारबद्ध
SAINT LUCIA KINGS HAVE SIGNED AARON JONES FOR THE UPCOMING CPL SEASON .#Cricket #CPL24 #westindies #ViratKohli #criccnation pic.twitter.com/sqK2I1QpFP
— Criccnation (@Criccnation) July 15, 2024
सेंट लूसिया किंग्स टीम: हेनरिक क्लासेन, फाफ डु प्लेसिस, नूर अहमद, डेविड विसे, भानुका राजपक्षे, मॅथ्यू फोर्ड, अल्जारी जोसेफ, जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेस, आरोन जोन्स, खारी पियरे, खारी कँपबेल, शैड्रैक डेसकार्टे, मिकेल गोविया, मॅकेनी क्लार्क, जोहान जेरेमिया आणि अकीम ऑगस्टे.