जसप्रीत बुमराहच्या ‘प्रेमाचा अंदाज’, पत्नी संजनाने शेअर केला रोमँटिक फोटो

जसप्रीत आणि संजना दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम व्यतित करतायत. (Sanjana Ganesan Share A Photo With A Jasprit Bumrah) Sanjana Ganesan Share A Photo With A Jasprit Bumrah

जसप्रीत बुमराहच्या 'प्रेमाचा अंदाज', पत्नी संजनाने शेअर केला रोमँटिक फोटो
संजना गणेशन हिने जसप्रीत बुमराहसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केलाय.
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 6:33 AM

मुंबई : टीम इंडियाचा स्टार बोलर आणि मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जो भल्या भल्या बॅट्समनची चुटकीसरशी विकेट घेतो, त्याच जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) विकेट मार्च 2021 मध्ये क्रिकेट समालोचक संजना गणेशन (Sanjana Ganesan) हिने घेतली. लग्नानंतर बायकोला जास्त वेळ देण्याऐवजी बुमराहला आयपीएलच्या मोहिमेवर जावं लागलं. पण सध्या कोरोनाच्या प्रकोपामुळे आयपीएल स्थगितीची घोषणा झाल्यानंतर जसप्रीत आपल्या घरी पोहोचलाय. दोघेही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम व्यतित करतायत. (Sanjana Ganesan Share A Photo With A Jasprit Bumrah)

संजनाने शेअर केला रोमँटिक फोटो

संजना गणेशन हिने जसप्रीत बुमराहसोबत एक रोमँटिक फोटो पोस्ट केलाय. इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्ल्या फोटोत ती जसप्रीतच्या खांद्यावर डोकं ठेऊन छानशी स्माईल करताना दिसत आहे. या फोटोला कोणतंही कॅप्शन दिलेलं नाही. केवळ घराची इमोजी वापरत संजनाने हा फोटो पोस्ट केला आहे. दोघांनाही एकत्र पाहून फॅन्सनाही आनंद झालाय. त्यांनी फोटोवर कमेंट करत दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

संजनाचा वाढदिवस, जसप्रीत दिल्लीहून थेट मुंबईला

गेले अनेक दिवस मुंबई इंडियन्स संघाबरोबर जसप्रीत आयपीएलच्या निमित्ताने बाहेर होता तर त्याची पत्नी संजना आयपीएल शो होस्ट करण्यासाठी मुंबईत होती. आयपीएलमध्ये बायोबबल असल्याने त्यांची कित्येक दिवस भेट होऊ शकली नव्हती. आयपीएल स्थगित झाल्यानंतर जसप्रीतने अखेर संजनाच्या वाढदिवशी थेट मुंबई गाठली आणि रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करत अनोख्या अंदाजात तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

संजना गणेशनहिचा काल गुरुवारी (06 मे) वाढदिवस होता. त्यानिमित्त बुमराहने खास रोमँटिक अंदाजात संजनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बुमराहने एक खास फोटो ट्विट करत पत्नी संजनाला गोड सरप्राईज दिलं. या फोटोत संजना जसप्रीतला किस करत असल्याचं दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

बुमराह आणि संजना मार्च महिन्यात विवाहबद्ध

टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह मार्च महिन्यात विवाहबद्ध झालाय. प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशनसोबत तो लग्नबेडीत अडकला. हा विवाहसोहळा गोव्यात पार पडला. बुमराहबरोबर लग्नासाठी संजना गणेशन आणि आणि (Anupama Parameswaran) दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन यांच नाव चर्चेत होतं. पण अखेर बुमराहने संजनासोबत लगीनगाठ बांधली. आता बुमराहच्या जीवनातील नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे.

(Sanjana Ganesan Share A Photo With A Jasprit Bumrah)

हे ही वाचा :

Team India | संघात स्थान हवंय? आधी वजन कमी कर, बीसीसीआयचा ‘या’ स्टार खेळाडूला सल्ला

Team India | इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडिया ‘इतके’ दिवस क्वारंटाईन राहणार, जाणून घ्या विराटसेनेचा प्लॅन

PHOTO | सचिन, विराटनंतर रिषभ पंत कोरोना विरुद्धच्या लढ्यात मैदानात, ‘या’ संस्थेद्वारे करणार मदत

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.