World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया जाहीर, ‘या’ दिग्गजाकडून घोषणा
टीम इंडियाच्या मॅनेजमेंटसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मात्र अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी वर्ल्ड कप साठी टीमची घोषणा केली आहे.
मुंबई : आगामी वन डे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने संघ बांधणीला सुरूवात केलीये. आता वर्ल्ड कपला काही दिवसांचा कालावधी राहिला असून सर्वच संघ तयारीला लागले आहेत. टीम इंडियामध्ये अजूनही मिडल ऑर्डरमध्ये कोण असणार याबाबत काही निश्चित झालं नाही. के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर अजुनही दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या मॅनेजमेंटसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मात्र अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी वर्ल्ड कप साठी टीमची घोषणा केली आहे.
संजय मांजरेकर यांनी 15 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. शुबमन गिल आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडे सलामीची जबाबदारी आहे. यामध्ये सर्वात सरप्राईज म्हणजे शिखर धवनला संघात स्थान दिलं आहे. युवा खेळाडू ईशान किशला संंधी दिली आहे. त्यासोबतच के.एल. राहुलला संधी दिली आहे.
गोलंदाजीमध्ये संजय मांजरेकरांनी संघात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या फिरकी जोडीचा समावेश केला आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्याकडे वेगवान गोलंदाजीची धुरा सोपवली आहे.
वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबर रोजी सुरुवात होणार असून, 19 नोव्हेंबर फायनल, पहिला आणि फायनल सामना नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. एकूण 10 शहरांमधील स्टेडियममध्ये आयोजन करण्यात आलं आहे. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून, पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.
संजय मांजरेकर यांनी वनडे वर्ल्डकप 2023 साठी निवडलेला संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, शिखर धवन, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन, प्रसिद्ध कृष्णा.