‘प्लेअर ऑफ द मॅच’ विराट कोहलीला दिल्यानंतर संजय मांजरेकर यांचा संताप, म्हणाले…

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. विराट कोहलीने या सामन्यात 59 चेंडूंचा सामना केला आणि 76 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाला 176 धावांपर्यंत मजल मारता आली. पण विराटला हा सन्मान दिल्याने संजय मांजरेकर नाराज झाला आहे.

'प्लेअर ऑफ द मॅच' विराट कोहलीला दिल्यानंतर संजय मांजरेकर यांचा संताप, म्हणाले...
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 5:01 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. या विजयानंतर 17 वर्षांनी भारतीय संघाने जेतेपदावर नाव कोरलं. भारताने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला झटपट विकेट गेल्याने विराट कोहलीने एक बाजू सावरून धरली. विराट कोहलीने 59 चेंडूत 76 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. पण या सामन्यात भारत विजयाच्या वाटेवर अनेक घडामोडी घडल्या. 30 चेंडूत 30 धावांची आवश्यकता असताना जसप्रीत बुमराह,अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने जबरदस्त गोलंदाजी केली. तसेच भारताला 7 धावांनी विजय मिळवून दिला. हेन्रिक क्लासेन आणि डेविड मिलर खेळपट्टीवर असताना विजय मिळवणं कठीण होतं. त्यामुळे अशा स्थिती विराट कोहलीला सामनावीराचा पुरस्कार दिल्याने संजय मांजरेकर यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोवर संजय मांजरेकर यांनी सांगितलं की, विराट कोहलीऐवजी हा पुरस्कार गोलंदाजाला द्यायला हवा होता.

संजय मांजरेकर यांनी सांगितलं की, “विराट कोहलीच्या खेळीमुळे हार्दिक पांड्याच्या वाटेला फक्त दोन चेंडू आले. भारतीय संघाची फलंदाजी चांगली होती. पण विराट कोहलीच्या खेळीमुळे भारतीय संघ अडचणीत आला होता. जर भारतीय गोलंदाजांनी डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली नसती तर भारतीय संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला असता. कारण हेन्रिक क्लासेनने 23 चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती. सामना 90 टक्के दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकला होता. त्यामुळे कोहलीच्या जागेवर गोलंदाजाला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार द्यायला हवा होता. ”

दुसरीकडे, झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांचं मत काहीसं वेगळं आहे. भारताने 176 धावांचं लक्ष्य दक्षिण अफ्रिकेसमोर ठेवली ही मोठी गोष्ट आहे. पण या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला असता तर विराट कोहलीवर टीका झाली असती, असंही त्यांनी मान्य केलं. दरम्यान, विराट कोहलीने सामनावीराचा पुरस्कार हाती घेताच टी20 फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता विराट कोहली वनडे आणि कसोटी सामन्यात खेळताना दिसेल.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.