’10 वर्षांचं वाटोळं केलं…’ धोनी-कोहली-रोहितच्या कर्णधारपदावर संजू सॅमसनच्या वडिलांचा गंभीर आरोप

भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर संजू सॅमसन दोन सामन्यात फेल गेला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. दरम्यान, सलग दोन शतकी खेळीनंतर संजू सॅमसनची जागा पक्की आहे. असं असताना संजू सॅमसनच्या वडिलांनी भारताच्या तीन दिग्गज कर्णधारांवर गंभीर आरोप केला आहे.

'10 वर्षांचं वाटोळं केलं...' धोनी-कोहली-रोहितच्या कर्णधारपदावर संजू सॅमसनच्या वडिलांचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 9:40 PM

संजू सॅमसन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. श्रीलंका आणि बांग्लादेश मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यात चांगली करता आली नव्हती. पण बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शतकी खेळई केली. त्याच्या विक्रमी खेळीनंतर संजू सॅमसनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. असं असताना गेल्या काही वर्षांपासून मनात बरंच काही साठवून ठेवलेल्या संजू सॅमसनच्या वडिलांचा राग अखेर बाहेर आला आहे. त्यांनी भारताच्या तीन माजी दिग्गज कर्णधारांवर गंभीर आरोप केला आहे. खरं तर संजू सॅमसनने 2015 मध्ये टी20 मध्ये पदार्पण केलं होतं. पण चांगली कामगिरी करूनही त्याला संघात स्थान मिळालं नव्हतं. पण 2024 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात त्याची प्रतिक्षा संपली आणि त्याला संधी मिळाली. संजू सॅमसनचे वडील विश्वनाथ यांनी मल्यालम चॅनेलशी बोलताना सांगितलं की, ‘तीन चार लोकांनी माझ्या मुलाच्या करिअरच्या 10 वर्षांचं वाटोळं केलं. धोनी, कोहली, रोहित आणि राहुल द्रविड सारख्या प्रशिक्षकामुळे त्याच्या करिअरची 10 वर्षे वाया गेली. त्याला जितकं मागे ढकललं तितकाच तो पुढे आला.’

‘श्रीकांत सांगितलं की संजूने कोणाच्या विरुद्ध शतक ठोकलं आहे. बांगलादेशविरुद्ध.. सर्व सांगत होते की तो एक महान खेळाडू आहे पण मी नाही बाघितलं. शतक तर शतक असतं. त्याच्याकडे राहुल आणि सचिनसारखा क्लासिकल गेम आहे, त्याचा तर सन्मान करा. मी गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवचं आभार व्यक्त करतो. जर हे आले नसते तर त्याला पुन्हा संघातून बाहेर केलं असतं. माझ्या मुलाच्या शतकाचं श्रेय या दोघांना जातं.’, असं संजू सॅमसनच्या वडिलांनी पुढे सांगितलं.

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर रोहित शर्माने निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीनंतर संजू सॅमसनचा संघातील मार्ग मोकळा झाला. गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्यावर विश्वास टाकला आणि ओपनिंगला संधी दिली. काही सामन्यात संजूला काही खास करता आलं नाही. पण त्यानंतर त्याने शतकी खेळी करून फॉर्म असल्याचं दाखवून दिलं. टी20 क्रिकेटमध्ये सलग दोन शतकं ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. पण पुन्हा एकदा दोन वेळा शून्यावर बाद झाल्याने टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.