राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनकडे टीमची मालकी, विराट-धोनीसारखा ‘बिझनेस प्लान’
राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने आता बिझनेस करण्यात रूची दाखवली आहे. विराट कोहली आणि धोनीसारखा बिझनेस प्लान आखला आहे. तसेच मोठी गुंतवणूकही केली आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी फ्रेंचायझींमध्ये खलबतं सुरु आहेत. पण राजस्थान रॉयल्स संघाने एक पाऊल पुढे टाकलं आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविकडे मार्गदर्शकाची भूमिका सोपवली आहे. तसेच कर्णधारपदाची धुरा संजू सॅमसनच्या खांद्यावर असेल हे देखील स्पष्ट केलं आहे. त्यामुळे संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स संघ उतरणार आहे. असं असताना संजू सॅमसनने व्यवसायात पाऊल टाकलं आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीसारखी फुटबॉल क्लबमध्ये भागीदारी घेतली आहे. सॅमसनने केरळा सुपर लीगच्या क्लब मलप्पुरम एफसीचा सह मालक बनला आहे. 9 सप्टेंबरला याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कोच्चिच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये मलप्पुरमने फॉर्को कोच्चिला मात दिली. या विजयानंतर संजू सॅमसन क्लबचा सह मालक असल्याची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली. सॅमसन आता अजमल बिस्मी, डॉ. अन्वर अमीन चेलात आणि बेबी नीलांबरा यांच्यासोबत मलप्पुरम एफसीचा मालक असेल.
मलप्पुरमचा हा क्लप देशांतर्गत सामने पायनॅड स्टेडियममध्ये खेळतो. या स्टेडियमला मलप्पुरम स्पोर्ट कॉम्प्लेक्स नावानेही ओळखलं जातं. पण हा क्लब आयलीग किंवा इंडियन सुपर लीग स्पर्धेत सहभागी नाही. पण संजू सॅमसनने आपल्या राज्याप्रती प्रेम दाखवलं आहे. त्याने क्रिकेटसोबत फुटबॉलला प्रमोट करण्याचा विडा उचलला आहे. संजू सॅमसन पूर्वी महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांनी फुटबॉल क्लबमध्ये रुची दाखवली आहे. महेंद्रसिंह धोनी इंडियन सुपर लीगच्या क्लब चेन्नईयन एफसी संघाचा सह मालक आहे. धोनीसह या क्लबमध्ये अभिषेक बच्चन आणि बिझनेस वुमन वीटा दानी यांचीही भागीदारी आहे. विराट कोहलीकडे क्लब एफसी गोवाची भागीदारी आहे. 2014 मध्येच त्याने या संघात गुंतवणूक केली होती. तर सचिन तेंडुलकर केरळा ब्लास्टर्सचा सहमालक आहे.
View this post on Instagram
फुटबॉल लीगमध्ये कालिकत एफसी, कन्नूर वॉरियर्स एफसी, कोची फोर्का एफसी, मलप्पुरम एफसी, तिरुवनंतपुरम कॉम्बन्स एफसी आणि थ्रिसूर मॅजिक एफसी असे एकूण सहा संघ आहेत. साखळी सामन्यानंतर यातील 4 संघ बाद फेरीत जाणार आहेत. दुसरीकडे, संजू सॅमसन दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. संजू सॅमसनचा इंडिया डी संघात सहभागी आहे. पण पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्या सामन्यात संधी मिळू शकते. श्रीकर भरतच्या जागी संधी मिळू शकते. कारण पहिल्या सामन्यात खेळला पण त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.