Sanju | 6, 6, 6, रशिदने ज्या मैदानावर हॅट्रिक घेतली त्याच मैदानावर संजूने त्याला सलग 3 सिक्स मारले, पाहा Video
राजस्थान संघाच्या 4 विकेट्स गेल्या होत्या. 13 वी ओव्हर सुरू झाली तरी संघाच्या 100 धावा झाल्या नव्हत्या. मात्र संजूने रशिदालाच गिऱ्हाईक बनवत संघाच्या विजयाचा पाया रचायला त्याचीच ओव्हर निवडली.
अहमदाबाद : गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात राजस्थान संघाने विजय मिळवला आहे. गुजरात टायटन संघाने प्रथम फलंदाजी करताना 177 धावा केल्या होत्या. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थान संघाने हे लक्ष अखेरच्या ओव्हरमध्येतीन चेंडू राखत पूर्ण केलं. यामध्ये संजू सॅमसनने 60 धाव तर हेटमायरने नाबाद 56 धावांची खेळी केली. संजूने करामती खानला सलग 3 सिक्सर मारले, ज्या मैदानावर रशिद खान याने हॅट्रीक घेतली त्याच मैदानावर संजूने सिक्सरची हॅट्रीक केली.
पाहा व्हिडीओ-
My Lord Sanju Samson 3 consecutive sixes vs Rashid khan ? Sanju is a gem ? player ? He deserves in India’s world cup 2023 team ?#SanjuSamson #GTvRR #RajasthanRoyals pic.twitter.com/vz1zqbaHen
— HR_in_RajasthanRoyals (@HrithikRoars) April 16, 2023
सामन्याच्या 13 व्या ओव्हरमध्ये संजू सॅमसनने रशिद खानला सलग तीन फिक्सर मारत सामन्यात कमबॅक केलं. कारण त्यावेळी संघाच्या 4 विकेट्स गेल्या होत्या. 13 वी ओव्हर सुरू झाली तरी संघाच्या 100 धावा झाल्या नव्हत्या. मात्र संजूने रशिदालाच गिऱ्हाईक बनवत संघाच्या विजयाचा पाया रचायला त्याचीच ओव्हर निवडली.
रशिद खान याने याच मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स यांच्याविरूद्ध हॅट्रीक घेतली होती. मात्र संजूने दबाव असतानाही रशिदसारख्या बॉलरविरूद्ध सिक्सर मारत त्याची ताकद दाखवून दिली आहे.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): ऋद्धिमान साहा (w), शुभमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पांड्या (क), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल