टी20 वर्ल्डकप संघाच्या प्लेइंग 11 मध्ये संजू सॅमसन की ऋषभ पंत? गौतम गंभीरने स्पष्टच सांगितलं की…
आयपीएल 2024 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. असं असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड केली आहे. या संघात विकेटकीपर बॅट्समन म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन आहे. पण यापैकी कोणाची निवड होणार? याबाबत गौतम गंभीरने मांडलं आपलं मत..
आयपीएल 2024 स्पर्धा संपली की संपली टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी 20 संघ मैदानात आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघ दोन गटात अमेरिकेत जाणार आहे. पहिल्या गटात आयपीएल प्लेऑफमधून बाहेर गेलेल्या संघातील खेळाडू असतील. त्यानंतर आयपीएल फायनल झाल्यानंतर दुसरा गट जाईल. अशी सर्व मांडणी सुरु असताना आयपीएलमध्ये काही खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीचं दर्शन घडवलं आहे. त्यामुळे संघात कोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता आहे. त्यात ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या दोघांनी आयपीएलमध्ये आपली छाप पाडली आहे. त्यामुळे प्लेइंग 11 मध्ये कोण असेल यासाठी आतापासूनच डोकेदुखी सुरु झाली आहे. असे सर्व प्रश्न उपस्थित होत असताना माजी क्रिकेटपटू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीरने आपलं मत मांडलं आहे. गौतम गंभीरने संजू सॅमसनऐवजी ऋषभ पंतला संधी देण्याची बाजू धरली आहे. पण हे दोन्ही खेळाडू तितकेच ताकदीचे असल्याचं सांगण्यासही विसरला नाही.
“टीम इंडियाला प्लेइंग इलेव्हनमध्ये एकाची निवड करायची असल्यास मी पंतला पसंती देईल. पंत आणि संजू दोघेही चांगले खेळाडू आहे. जितकी क्षमात संजूमध्ये आहे तितकीच पंतमध्येही आहे. पण यापैकी एकाची निवड करायची झाल्यास मी पंतला पसंती देईल. कारण मधल्या फळीत त्याची कामगिरी उत्तम आहे. आयपीएलमध्ये संजू सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. तर पंत पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर खेळतो.”, असं गौतम गंभीरने सांगितलं.
“टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाला एका चांगल्या कॉम्बिनेशनची गरज आहे. आम्हाला विकेटकीपर बॅट्समनची गरज मधल्या फळीत आहे. टॉप ऑर्डरसाठी नाही. यासाठी मी ऋषभ पंत पसंती देईन. या व्यतिरिक्त एक बाब ऋषभ पंतच्या बाजूने जाते ती म्हणजे तो डावखुरा फलंदाज आहे.”, असंही गंभीर पुढे म्हणाला. आयपीएल 2024 मध्ये ऋषभ पंत आणि संजू सॅमसन एकाच शैलीत खेळत धावा करताना दिसले. संजू सॅमसनने आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यात 486 धावा केल्या आहेत. तर ऋषभ पंतने 13 सामन्यात 446 धावा केल्या आहेत.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (वीसी), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान