IND vs BAN : 4,4,4,4, संजू सॅमसनची आक्रमक सुरुवात, तास्किन अहमदची धुलाई

Sanju Samson 4 Four: संजू सॅमसनला पहिल्या 2 सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करता न आल्याने टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र संजूने तिसऱ्या सामन्यात आक्रमक सुरुवात केली आहे.

IND vs BAN : 4,4,4,4, संजू सॅमसनची आक्रमक सुरुवात, तास्किन अहमदची धुलाई
Sanju samson ind vs ban 3rd t20i
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 7:33 PM

टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी20I सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडीने मैदानात आली. या जोडीने पहिल्या षटकात 7 धावा केल्या. त्यानंतर संजूने दुसऱ्या ओव्हरमध्ये सलग 4 चौकार ठोकले. संजूने यासह या सामन्यात झंझावाती बॅटिंग करणार असल्याचं स्पष्ट केलं.

संजूचे सलग 4 चौकार

पहिल्या ओव्हर संजूने 3 आणि अभिषेक शर्मा याने 4 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या बिनबाद 7 अशी झाली. त्यांनतर बांगलादेशकडून तास्किन अहमद दुसरी ओव्हर टाकायला आला. तास्किनने पहिल्या 2 बॉलमध्ये संजूला एकही धाव काढू दिली नाही. मात्र त्यानंतर संजूने चाबूक बॅटिंग केली. संजूने उर्वरित चारही चेंडूत सलग 4 चौकार ठोकत तास्किनची धुलाई केली. टीम इंडियाला अशाप्रकारे दुसऱ्या ओव्हरमध्ये एकूण 16 धावा मिळाल्या.

अभिषेक शर्मा अपयशी

दरम्यान अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी सलग तिसऱ्या सामन्याही टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरली. संजूने ठोकलेल्या सलग 4 चौकारांमुळे टीम इंडियाची स्थिती 2 षटकानंतर 23 अशी झाली. टीम इंडियाला आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र या दोघांना या भागीदारीचं मोठ्या भागीदारीत रुपांतर करण्यात अपयश आलं. अभिषेक शर्मा तिसऱ्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर आऊट झाला. ताझिंम हसन साकीब याने अभिषेक शर्मा याला 4 धावांवर महेदी हसन याच्या हाती कॅच आऊट केलं.

संजूचा ‘चौकार’

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमान, लिटन दास (विकेटकीपर), तन्झिद हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान आणि तांझिम हसन साकिब.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि मयंक यादव.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.