111, 107..आणि..! संजू सॅमसनने तीन चेंडूत संपवला खेळ, शतकांची हॅटट्रीक हुकली

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात संजू सॅमसनकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र या आशा धुळीस मिळाल्या आहेत.

111, 107..आणि..! संजू सॅमसनने तीन चेंडूत संपवला खेळ, शतकांची हॅटट्रीक हुकली
Follow us
| Updated on: Nov 10, 2024 | 7:52 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा टी20 सामना सुरु आहे. चार सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे कमबॅकसाठी दक्षिण अफ्रिकेची धडपड सुरु आहे. त्यामुळे फॉर्मात असलेल्या खेळाडूंना झटपट बाद करण्याचं मोठं आव्हान दक्षिण अफ्रिकेसमोर आहे. त्या दृष्टीने दक्षिण अफ्रिकेने पावलं उचलल्याचं दिसत आहे. कारण दक्षिण अफ्रिकेच्या जाळ्यात मोठा मासा लागला आहे. सलग दोन सामन्यात शतक ठोकणाऱ्या संजू सॅमसनची भिती होती. पण पहिल्याच सामन्यात बाद करून टीम इंडियाला दणका दिला आहे. मार्को यानसेन पहिलं षटक टाकण्यासाठी आला आहे. पहिले दोन चेंडू निर्धाव गेल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्रिफळा उडवला. त्यामुळे पुन्हा एकदा संजू सॅमसन शून्यावर बाद झाला आहे. मागच्या दोन सामन्यात शतकी खेळी केली होती. बांगलादेशविरुद्ध 111 आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 107 धावांची खेळी केली होती. तिसऱ्या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. संजू सॅमसनची शून्यावर बाद होण्याची ही पाचवी वेळ आहे. या यादीत रोहित शर्मा टॉपला असून 12 वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्यानंतर विराट कोहली 7 वेळा, केएल राहुल 5 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

संजू सॅमसन बाद झाल्यानंतर टीम इंडियावर दडपण वाढलं आहे. इतकंच काय तर अभिषेक शर्माही काही खास करू शकला नाही. वारंवार संधी मिळूनही फेल गेला आहे. अभिषेक शर्माने 5 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 4 धावा करून बाद झाला. गेराल्ड कोएत्झीने त्याला बाद केलं.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, न्काबायोमझी पीटर.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.