Video : मुंबईत सारा आणि शुबमन दिसले एकत्र! कॅमेरा पाहताच गिलने काढला पळ

| Updated on: Nov 01, 2023 | 4:27 PM

सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांना पुन्हा एकदा एकत्र स्पॉट केलं गेलं. त्यामुळे त्यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीच अधिकृत माहिती नसून या फक्त चर्चा आहेत. दरम्यान टीम इंडिया मुंबईत असून पुढील सामना वानखेडेवर होणार आहे.

Video : मुंबईत सारा आणि शुबमन दिसले एकत्र! कॅमेरा पाहताच गिलने काढला पळ
Video : श्रीलंका विरुद्धच्या सामन्यापूर्वी सारा-शुबमन भेटले! कॅमेरा पाहताच गिलने पाठ फिरवली
Follow us on

मुंबई : सोशल मीडियाचं युग असून नेटकऱ्यांचं अंदाजाचं काय खरं नसतं. कधी कोणती गोष्ट डोक्यावर उचलून धरतील आणि कधी आपटतील सांगता येत नाही. अनेकदा काही नाती जोडण्याचा प्रयत्न देखील केला जातो. त्यामुळे सेलिब्रिटींना सार्वजनिक जीवनात वावरताना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा त्याच त्याच प्रश्नांचा भडीमार झाला की त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसून येते. असंच काहीस सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्या बाबतीत सुरु आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याबाबत अनेकदा चर्चा रंगतात. पण त्याबाबत अधिकृतरित्या काहीच सांगण्यात आलेलं नाही. भारत बांगलादेश सामन्यादरम्यान सारा तेंडुलकर सामना पाहण्यासाठी आली होती. तेव्हा तिच्याकडे जेव्हा जेव्हा कॅमेरा फिरत होता तेव्हा तेव्हा नेटकरी वेगळाच अंदाज बांधत होते. आता सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांना जियो वर्ल्ड प्लाझामध्ये एका कार्यक्रमात एक पाहिलं गेलं. त्यामुळे आता चर्चा तर होणारत ना..

कार्यक्रमात सारा तेंडुलकर रेड आउटफिटमध्ये, तर शुबमन गिल ब्लॅक आउटफिटमध्ये दिसले. या कार्यक्रमातून दोघं बाहेर निघाले होते. सारा पुढे पुढे चालत होती. तर शुबमन गिल मागून येत होता. पण तितक्यात त्याची नजर कॅमेऱ्याकडे पडली आणि त्याने पळ काढला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

जियो वर्ल्ड प्लाजामध्ये बॉलिवूडमधील नामवंत कलाकारांची उपस्थिती होती. नीता आणि मुकेश अंबानी या कार्यक्रमात होते. तसेच शुबमन गिल व्यतिरिक्त इतर खेळाडूही या कार्यक्रमाला उपस्थित होते. रोहित शर्मा आणि पत्नी रितिका देखील हजर होते. या व्यतिरिक्त रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, रितेश देशमुख, जेनेलिया, शहनाज गिल, सोनम कपूर यासह अनेक कलावंत होते.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने सलग सहा सामने जिंकत उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे. दुसरीकडे टीम इंडियाचा सातवा सामना श्रीलंकेशी 2 नोव्हेंबरला होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. शुबमन गिल डेंग्युमुळे सुरुवातीच्या दोन सामन्यांना मुकला होता. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध काही खास करू शकला नाही. बांगलादेश विरुद्ध 53 धावांची खेळी केली होती.