IND vs BAN : सारा तेंडुलकर हिचं शुबमनच्या चौकारानंतर जंगी सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल!
Sara Tendulkar shubman Gill Video : भारत आणि बांगलादेशच्या सामन्यामध्ये सारा तेंडुलकर हिने उपस्थिती लावली आहे. सारा आणि शुबमनचं नाव जोडलं जातं पण एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
मुंबई : वर्ल्ड कपमधील भारत आणि बांगलादेशमध्ये 17 वा सामना सुरू असून या सामन्यामध्ये भारत बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत आहे. पुण्यातील गहुंजे येथे हा सामना पार पडत असून माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर उपस्थित आहे. सारा तेंडुलकर आणि भारतीय खेळाडू शुबमन गिल रिलेशनमध्ये असल्याचं बोललं जातं. आजच्या सामन्याला साराने हजेरी लावल्याने नेटकऱ्यांनी मीम्सचा पाऊस पाडला. अशातच साराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
बांगलादेशने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात रोहित शर्मा आणि शुबमन गिल उतरले होते. रोहितने नेहमीप्रमाणे सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्यासोबतच गिलनेही आज पहिल्याच चेंडूवर चौकार मारत झकास सुरूवात केलेली. रोहितने आपलं आक्रमण सुरू ठेवलेलं असताना गिलसुद्धा चौकार मारत होता. असाच सातव्या ओव्हरमध्ये दुसऱ्याच ओव्हरमध्ये चौकार मारला त्यानंतर सारा तेंडुलकर टाळ्या वाजवताना दिसली.
पाहा व्हिडीओ-
Sara Tendulkar cheering Shubman Gill’s boundary. #Sara #SaraTendulkar #ShubmanGill#indiavsbangladesh #INDvsBANpic.twitter.com/8Qb6uesDBP
— Shekhar ❤🇮🇳 (@Shekhar_O7) October 19, 2023
सारा तेंडुलकर हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवरून परत एकदा दोघांच्या नात्याबाबत अंदाज बांधत पोस्ट केल्या आहेत. याआधीही अनेकवेळा शुबमन आणि साराचं नाव जोडलं गेलं आहे. मात्र दोघांनीही अधिकृत कोणतंही भाष्य केलेलं नाही. या सामन्यामध्ये भारताचा सलामीवीर खेळाडू शुबमन गिल याने अर्धशतकी खेळी करून मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. शुबमन अर्धशतक करताच 53 धावा करून बाद झाला.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद, नजमुल हुसेन शांतो (C), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (Wk), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम