‘संघात जर खेळायचं असेल तर बोलिंग करावीच लागेल’, निवड समितीच्या माजी सदस्याकडून हार्दिकला खडेबोल

निवड समितीचे माजी सदस्य सरनदीप सिंग यांनी हार्दिकला डच्चू देण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. (Sarandeep Singh On Hardik Pandya not selected in WTC final India vs England)

'संघात जर खेळायचं असेल तर बोलिंग करावीच लागेल', निवड समितीच्या माजी सदस्याकडून हार्दिकला खडेबोल
हार्दिक पांड्या
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 6:37 AM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship Final) अंतिम सामन्यासाठी तसंच इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. या जाहीर केलेल्या संघात अष्टपैलू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) संघात स्थान देण्यात आलेलं नाही. हार्दिकला डच्चू दिल्यानंतर त्याच्यावर अनेक दिग्गजांनी आपापलं मत मांडलं. निवड समितीचे माजी सदस्य सरनदीप सिंग यांनी हार्दिकला डच्चू देण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. खेळाडू जर ऑलराऊंडर म्हणून संघात खेळत असेल आणि तो बोलिंग टाकत नसेल, तर त्याला केवळ बॅटिंगच्या आधारावर संघात कशी जागा द्यायची?, असा सावल करत त्यांनी हार्दिकला वगळण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. (Sarandeep Singh On Hardik Pandya not selected in WTC final India vs England)

सरनदीप सिंग काय म्हणाले?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून हार्दिक पांड्या आऊट झाला आहे. मात्र त्याला संघातून का वगळलं याची बीसीसीआयकडे ठोस कारणं आहेत. पहिल्यांदा तर त्याला वगळण्याच्या निर्णयाचा मी आदर करतो आणि स्वागतही करतो. कारण जर एक अष्टपैलू खेळाडू संघात खेळत असेल पण तो बोलिंग करत नसेल तर त्याला संघात खेळण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न पडतो. हार्दिक शस्त्रक्रियेनंतर बोलिंग टाकू शकत नाहीय. गेले अनेक दिवस त्याने बोलिंग केलेली नाहीय. मला वाटतं जर कुणालाही संघात अष्टपैलू म्हणून खेळायचं असेल तर त्याने बॅटिंग आणि बोलिंग या दोन्ही विभागात योगदान द्यायला हवं, असं सरनदीप सिंग म्हणाले. ते पीटीआयशी बोलत होते.

हार्दिकवर 2019 साली शस्त्रक्रिया

हार्दिकच्या पाठीवर 2019 साली शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याच्यानंतर त्याने नियमितपणे गोलंदाजी केलेली नाहीय. म्हणजेच त्याच्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सचा भारतीय संघाला फायदा झालेला नाहीय. जर तो बोलिंग टाकू शकत नसेल तर भारतीय संघातील अंतिम 11 खेळाडूंमध्ये तो जागा कशी बनविणार? असा सवाल सरनदीप सिंग यांनी केला.

हार्दिकमुळे संघाच्या समतोलावर परिणाम

जर हार्दिकने बोलिंग टाकली नाही तर संघाच्या संतुलनावर त्याचा परिणाम पडतो. त्याच्यामुळे संघात आणखी एक बोलर्स खेळवावा लागतो. जर अतिरिक्त एल बोलर्स खेळला तर सूर्यकुमार यादवसारखा चांगल्या बॅट्समनला संघाबाहेर बसावं लागतं. आपण इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेदरम्यान याचा परिणाम भोगलाय. आपण 5 बोलर्स घेऊन खेलू शकत नाही. शेवटी कुणीतरी एक ऑलराऊंडर खेळवावा लागेल आणि भारतीय संघ त्याच दिशेने पावलं टाकतोय, असंही सरनदीप सिंग म्हणाले.

बीसीसीआयचा गांभीर्यपूर्वक विचार

हार्दिक पांड्याला संघातून वगळल्यानंतर अनेक क्रिकेट चाहत्यांना त्याला का डच्चू दिली असावा? असा प्रश्न सतावत होता. मात्र हार्दिकची फिटनेस समस्या आणि त्याचा खराब फॉर्म या दोन गोष्टींचा बीसीसीआयने अगदी गांभीर्यपूर्वक विचार केला आणि त्याचा भारतीय संघात समावेश होऊ शकला नाही.

(Sarandeep Singh On Hardik Pandya not selected in WTC final India vs England)

हे ही वाचा :

World Test Championship final 2021 | निवड समितीने ‘या’ 2 कारणांचा विचार केला अन् हार्दिक पांड्याला संघातून डच्चू दिला!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.