“पृथ्वीकडे ती क्षमता जी सेहवागकडे होती, त्याचा इंग्लंड दौऱ्यात समावेश का नाही?”

इंग्लंड दौऱ्यासाठी पृथ्वी शॉ चा संघात समावेश करण्यात आलेला नाही. तो चांगला खेळाडू आहे तसंच आक्रमक बॅटसमन आहे, त्याच्यासारख्या प्रतिभेच्या खेळाडूचा संघात समावेश नाही, हे चुकीचं आहे तसंच संघ निवडताना निवड समिती घाई करतीय, असं सरनदीप सिंग म्हणाले. (Sarandeep Singh Prithvi Shaw WTC 2021 India vs England)

पृथ्वीकडे ती क्षमता जी सेहवागकडे होती, त्याचा इंग्लंड दौऱ्यात समावेश का नाही?
पृथ्वी शॉ आणि वीरेंद्र सेहवाग
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 7:04 AM

मुंबईवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship Final) अंतिम सामन्यासाठी तसंच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. बीसीसीआयने 4 राखीव खेळाडूंसह एकूण 24 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात धडाकेबाज बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi shaw) ला स्थान देण्यात आलेलं नाहीय. यावरुन बरीच चर्चा होतीय. अशातच निवड समितीचे माजी सदस्य सरनदीप सिंह (Sarandeep Singh) यांनी  नाराजी व्यक्त केलीय. नेमकं काय कारण आहे की कसोटी संघात पृथ्वी शॉ चा समावेश होऊ शकलेला नाही, असा थेट सवाल त्यांनी निवड समितीला विचारला आहे. (Sarandeep Singh Question Selecter Over Prithvi Shaw not select WTC 2021 India vs England)

इंग्लंड दौऱ्यासाठी पृथ्वी शॉ चा संघात समावेश करण्यात आलेला नाही. तो चांगला खेळाडू आहे तसंच आक्रमक बॅटसमन आहे, त्याच्यासारख्या प्रतिभेच्या खेळाडूचा संघात समावेश नाही, हे चुकीचं आहे तसंच संघ निवडताना निवड समिती घाई करतीय, असं सरनदीप सिंग म्हणाले.

पृथ्वीकडे ती क्षमता, जी सेहवागकडे होती!

पृथ्वी शॉ कडे ती क्षमता आहे जी भारतीय संघात वीरेंद्र सेहवागकडे होती. सुरुवातीला येऊन प्रतिस्पर्धी संघावर हुकमत गाजवणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. ते काम सेहवाग करायचा आणि आता पृथ्वी करतो. तुम्ही त्याच्याकडे करिअरच्या ऐन मोक्यावर दुर्लक्ष करु शकत नाही. ऑस्ट्रेलियात दौऱ्यात त्याला अपयश आलं असेल पण त्याने पुन्हा भारतात येऊन स्वत:ला सिद्ध केलं, विजय हजारे करंडकात खोऱ्याने धावा केल्या. त्याची तंत्र सुधारली, आयपीएलमध्ये जलवा दाखवला, आणखी पृथ्वीने काय करायला हवं?, असा सवाल सरनदीप सिंग यांनी केला.

भारतीय संघात सध्या पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल हे दोन ताकदीचे आणि प्रतिभासंपन्न खेळाडू आहेत. दोघांकडेही चांगले फटके खेळण्याची क्षमता आहे. त्यांनी संधी मिळाल्यावर त्यांचं कतृत्व सिद्ध केलंय. अशा खेळाडूंच्या पाठीमागे उभं राहायला हवं, असं ते म्हणाले.

पृथ्वी शॉ ची धडाकेबाज कामगिरी पण निवड समितीचं दुर्लक्ष

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पृथ्वी शॉ ची बॅट बोलली नाही, त्यानंतर त्याला संघात स्थान देण्यात आलं नाही. परंतु ऑस्ट्रेलियावरुन आल्यानंतर अंगात जादू संचारावी तशी पृथ्वीच्या बॅटमधून धावांची बरसात झाली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने 827 रन्स फटकावल्या तसंच मुंबईला विजय मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका पार पाडली. याशिवाय आयपीएलमध्येही पृथ्वीने कमाल केली. त्याने 7 सामन्यात तीन अर्धशतकांच्या मदतीने 308 धावा केल्या.

(Sarandeep Singh Question Selecter Over Prithvi Shaw not selecter WTC 2021 India vs England)

हे ही वाचा :

‘संघात जर खेळायचं असेल तर बोलिंग करावीच लागेल’, निवड समितीच्या माजी सदस्याकडून हार्दिकला खडेबोल

World Test Championship final 2021 : एका मॅचवरुन तुम्ही पृथ्वीला जज करु शकत नाही, आशिष नेहरा भडकला

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.