Sarfaraz Khan चं पदार्पणात सलग दुसरं अर्धशतक, अशी कामगिरी करणारा तिसराच फलंदाज
Sarfaraz Khan Fifty | मुंबईकर सरफराज खान याने आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणात इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सलग दुसरं अर्धशतक ठोकून इतिहास रचला आहे.
राजकोट | टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि डेब्युटंट मुंबईकर सरफराज खान याने इतिहास रचला आहे. सरफराज खान याने आपल्या कसोटी कारकीर्दीची अविस्मरणीय सुरुवात केली आहे. सरफराज खान याने कसोटी पदार्पणात इंग्लंड विरुद्ध राजकोट येथे सलग दुसरं अर्धशतक ठोकलं आहे. सरफराज खानने 65 बॉलमध्ये 5 चौकार आणि 1 सिक्स ठोकत हे अर्धशतक झळकावलं.
सरफराज खान याने पहिल्या डावात 48 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं होतं. सरफराजने पहिल्या डावातील या अर्धशतकी खेळीत 7 चौकार आणि 1 सिक्स खेचला. मात्र तो दुर्देवी ठरला. रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे सरफराज नॉन स्ट्राईक एंडवर रन आऊट झाला. सरफराज 62 धावांवर रन आऊट झाल्याने कॅप्टन रोहित शर्मा हा देखील जडेजावर संतापला. मात्र त्यानंतर सरफराजने त्याच जोशात सलग दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावलं.
यशस्वीला शानदार साथ
सरफराजने केवळ अर्धशतक ठोकलं नाही, तर आपला मुंबईकर साथीदार यशस्वी जयस्वाल यालाही चांगली साथ दिली. यशस्वीने या दरम्यान मालिकेतील आणि कारकीर्दीतील दुसरं द्विशतक केलं. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 159 बॉलमध्ये नाबाद 172 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने टीम इंडियाचा डाव हा 430 धावांवर घोषित केला. यशस्वी जयस्वालने नाबाद 214 आणि सरफराजने 68 धावा केल्या. सरफराजने 72 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावा केल्या.
मुंबईकर सरफराज खानचं पदार्पणात सलग दुसरं अर्धशतक
Making it count on Test debut & how! 👌 👌
Sarfaraz Khan notches up his 2⃣nd half-century in the match 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/FM0hVG5pje#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/q10DCCCHED
— BCCI (@BCCI) February 18, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.