Irani Cup : सर्फराज खानचं ऐतिहासिक द्विशतक, 52 वर्षांआधीचा रेकॉर्ड उद्धवस्त
Sarfaraz Khan Double Hundred: सर्फराज खान इराणी कप स्पर्धेच्या इतिहासात द्विशतक करणारा पहिला मुंबईकर फलंदाज ठरला आहे. सर्फराजने या द्विशतकी खेळी दरम्यान एक खास रेकॉर्ड केला आहे.
मुंबईकर फलंदाज सर्फराज खान याने इराणी कप स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रात रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध ऐतिहासिक द्विशतक झळकावलं आहे. सर्फराज खान याच्या द्विशतकासह मुंबई आणखी मजबूत स्थितीत पोहचली आहे. तसेच सर्फराजने या द्विशतकी खेळी दरम्यान इतिहास रचला आहे. सर्फराज खान इराणी कप स्पर्धेच्या इतिहासात द्विशतक करणारा पहिलाच मुंबईकर फलंदाज ठरला आहे. तसेच सर्फराजने दिग्गज खेळाडूचा 52 वर्षांआधीचा विक्रम उद्धवस्त केला आहे.
सर्फराजने डावातील 127 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर एकेरी धाव घेत द्विशतक पूर्ण केलं. सर्फराजने 79.05 च्या स्ट्राईक रेटने 23 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने हे द्विशतक केलं. सर्फराजने या दरम्यान रामनाथ पारकर यांना इराणी कपमध्ये मुंबईसाठी सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला. रामनाथ पारकर यांनी मुंबईकडून इराणी कपमध्ये 1972 साली नाबाद 194 धावांची खेळी केली होती.
इराणी कपमध्ये मुंबईकर फलंदाजांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
- सर्फराज खान – 200*
- रामनाथ पारकर – 194* (1972)
- अजिंक्य रहाणे – 191 (2024)
- सुधाकर अधिकारी – 173 (1963)
- झुबीन भरुचा – 164* (1994)
मुंबई भक्कम स्थितीत
दरम्यान सर्फराजच्या द्विशतकामुळे मुंबई भक्कम स्थितीत पोहचली आहे. सरफराजने द्विशतक पूर्ण केलं तोवर मुंबईने 8 बाद 483 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता मुंबई 2 विकेट्सच्या मोबदल्यात आणखी किती धावा करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
सरफराज खानचं ऐतिहासिक द्विशतक
💯 turns into 2⃣0⃣0⃣ 👌
A sensational double century for Sarfaraz Khan✌️
He becomes the 1⃣st Mumbai player to score a double ton in #IraniCup 👏
The celebrations say it all 🎉#IraniCup | @IDFCFIRSTBank
Follow the match ▶️ https://t.co/Er0EHGOZKh pic.twitter.com/225bDX7hhn
— BCCI Domestic (@BCCIdomestic) October 2, 2024
मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सरफराज खान, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि एम जुनेद खान.
रेस्ट ऑफ इंडिया प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, इशान किशन, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, यश दयाल, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.