Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्फराज खानची बांगलादेश कसोटी संघात निवड, पण खेळावं लागणार इंडिया बी संघाकडून!

बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे. तत्पूर्वी दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा सामना पार पडणार आहे. पण या टप्प्यात अनेक दिग्गज खेळाडू खेळणार नाही. कारण त्याची निवड भारतीय संघात झाली आहे.

सर्फराज खानची बांगलादेश कसोटी संघात निवड, पण खेळावं लागणार इंडिया बी संघाकडून!
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 4:51 PM

दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना 12 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यासाठी चारही संघ सज्ज झाले आहेत. इंडिया डी संघ वगळता इतर तीन संघातील खेळाडूंची वर्णी भारतीय संघात लागली आहे. दिग्गज खेळाडूंची वर्णी टीम इंडियात लागल्यानंतर बीसीसीआयने ही पोकळी भरून काढली आहे. शुबमन गिलच्या जागी इंडिया ए संघाची धुरा मयंक अग्रवालकडे सोपवण्यात आली आहे. तर इंडिया बी संघात रिंकु सिंहची एन्ट्री झाली आहे.असं असातना एक महत्त्वाची बातमी बीसीसीआयच्या सूत्रांकडून समोर येत आहे. 12 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात सर्फराज खान खेळणार आहे. अजून तरी याबाबत अधिकृत काहीही सांगण्यात आलं नाही. पण पुढच्या 24 तासात हा निर्णय होऊ शकतो. कारण केएल राहुलची वर्णी प्लेइंग इलेव्हनमध्ये लागेल असं दिसत आहे. त्यामुळे सर्फराज खानला तशी प्लेइंग 11 मध्ये जागा मिळणार नाही. त्यामुळे बीसीसीआय त्याला दुलीप ट्रॉफी खेळण्यास सांगू शकते. 12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर हा सामना असणार आहे. चार दिवसानंतर लगेचच बांगलादेश विरुद्धचा कसोटी सामना होणार आहे. त्यामुळे 19 सप्टेंबरपासून सर्फराज खान पुन्हा हजर असेल.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, ‘बाहेरच्या लोकांना कळत नाही की टीम कसं काम करते. राहुलला ड्रॉप केलं नव्हतं. पण तो दुखापतग्रस्त होता. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध शतक आणि दुखापतग्रस्त होण्यापूर्वी हैदराबादमध्ये 86 धावा केल्या होत्या. त्याच्या फॉर्मसह संघ व्यवस्थापन त्याला आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी महत्त्वाचा खेळाडू मानते.’ बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, ‘सर्फराज खान संघातील प्रबळ दावेदार आहे. दुखापत किंवा कोणतीही परिस्थिती उद्भवली तर सर्फराज खानला प्रथम स्थान मिळेल. सर्फराजने सर्वकाही बरोबर केलं आहे. जर संधी मिळी तर त्याला पहिली जागा मिळेल.’

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी संभाव्य प्लेइंग 11 : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.