SCO vs AUS : कॅमरुन ग्रीनची ऑलराउंड कामगिरी, ऑस्ट्रेलियाची विजयी हॅटट्रिक, स्कॉटलँडलचा 3-0 ने धुव्वा

Scotland vs Australia 3rd T20i Higlights: कॅमरुन ग्रीन याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडवर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 6 विकेट्सने सहज विजय मिळवला.

SCO vs AUS : कॅमरुन ग्रीनची ऑलराउंड कामगिरी, ऑस्ट्रेलियाची विजयी हॅटट्रिक, स्कॉटलँडलचा 3-0 ने धुव्वा
Australia won series against scotland
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 10:58 PM

ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँड विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20I सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. स्कॉटलँडकडून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 150 धावांचं आव्हान मिळालं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 23 बॉलआधी 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 16.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 153 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने या विजयासह स्कॉटलँडला 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप दिला. ऑस्ट्रेलियासाठी ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. ग्रीनने 62 धावांची खेळी केली. जेक फ्रेझर-मॅकगर्क याचा अपवाद वगळता इतर सर्व फलंदाजांनी विजयात योगदान दिलं. जेक फ्रेझर-मॅकगर्क याला भोपळाही फोडता आला नाही.

कॅमरुन ग्रीन याने 39 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 2 फोरसह नॉट आऊट 62 रन्स केल्या. कॅप्टन मिचेल मार्श याने 31 धावांचं योगदान दिलं. टीम डेव्हिड याने 25 रन्स केल्या. ट्रेव्हिस हेड याने 12 धावा केल्या. तर आरोन हार्डीने नाबाद 11 धावा केल्या. स्कॉटलँडकडून ब्रॅडली करी याने 2 विकेट्स घेतल्या. तर क्रिस्तोफर सोल आणि जॅक जार्विस या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून स्कॉटलँडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. स्कॉटलँडने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 149 धावा केल्या. स्कॉटलँडसाठी ब्रँडन मॅकमुलेन याने सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. ब्रँडनने 39 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 56 धावांची खेळी केली. जॉर्ज मुन्सेने 25 धावा केल्या. मार्क वॅटने 18 धावांचं योगदान दिलं. मायकेल लीस्क याने 13 आणि ऑली हेअर्स याने 12 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियासाठी कॅमरुन ग्रीन याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. आरोन हार्डी आणि सीन एबोट या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या.तर मार्कस स्टोयनिस आणि एडम झॅम्पा या दोघांना 1-1 विकेट मिळाली.

ऑलराउंडर कॅमरुन ग्रीनची शानदार कामगिरी

स्कॉटलँड प्लेइंग ईलेव्हन : रिची बेरिंग्टन (कर्णधार), जॉर्ज मुन्से, ऑली हेअर्स, ब्रँडन मॅकमुलेन, मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), मायकेल लीस्क, मार्क वॉट, जॅक जार्विस, क्रिस्टोफर सोल, सफियान शरीफ आणि ब्रॅडली करी.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, टीम डेव्हिड, मार्कस स्टॉइनिस, कूपर कोनोली, आरोन हार्डी, शॉन ॲबॉट आणि ॲडम झॅम्पा.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.