T20I Series : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीमची घोषणा, कॅप्टन कोण?
T20i Cricket: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या 3 सामन्यांच्या टी20i सीरिजसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पाहा कुणाला मिळाली संधी?
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. स्कॉटलँड क्रिकेट टीमने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलिया सप्टेंबर महिन्यात स्कॉटलँड दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात स्कॉटलँड विरुद्ध 4 ते 7 सप्टेंबर दरम्यान 3 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियानंतर आता स्कॉटलँडने 17 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. त्यानुसार रिची बेरिंग्टन हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध या मालिकेत स्कॉटलँडचं नेतृत्व करणार आहे. तर मिचेल मार्श याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.
वर्ल्ड कपनंतर पुन्हा आमनेसामने
ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड दोन्ही संघ या मालिकेनिमित्ताने टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनंतर पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. उभयसंघात 16 जून रोजी सामना झाला होता. ऑस्ट्रेलियाने त्या सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवला होता. स्कॉटलँड्ने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 180 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 2 बॉल राखून 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं होतं. ऑस्ट्रेलियाने 19.4 ओव्हरमध्ये 186 धावा करुन सामना 5 विकेट्सने जिंकला. त्यानंतर आता 4 सप्टेंबरपासून दोन्ही संघात चुरस पाहायला मिळणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने हे
टी20i सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, बुधवार, 4 सप्टेंबर
दुसरा सामना, शुक्रवार, 6 सप्टेंबर
तिसरा सामना, शनिवार, 7 सप्टेंबर
स्कॉटलँडकडून 17 सदस्यीय संघ जाहीर
Richie Berrington will lead a 17-member squad for the upcoming three-match T20I series against Australia 👊https://t.co/GrYfpeff9X
— ICC (@ICC) August 14, 2024
स्कॉटलँड विरूद्धच्या टी 20सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया टीम: मिचेल मार्श (कॅप्टन), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेवीहिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमरुन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉयनिस आणि ॲडम झॅम्पा. इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी स्कॉटलँड टीम : रिची बेरिंग्टन (कॅप्टन), चार्ली कॅसल, मॅथ्यू क्रॉस, ब्रॅडली करी, जॅस्पर डेव्हिडसन, ख्रिस ग्रीव्ह्ज, ओली हेअर्स, जॅक जार्विस, मायकेल जोन्स, मायकेल लीस्क, ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मुन्से, साफयान शरीफ, ख्रिस सोल, चार्ली टीयर, मार्क वॅट आणि ब्रॅडली व्हील.