क्रिकेटच्या मैदानातून मोठी बातमी समोर आली आहे. तीन वर्ल्ड कप खेळलेल्या खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. 15 वर्षांच्या करियरमध्ये या खेळाडूने वन डे वर्ल्ड कप 2015, टी-20 वर्ल्ड कप 2016 आणि टी-20 वर्ल्ड कप 2021 हे वर्ल्ड कप खेळले. होते. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ॲलासडेअर इव्हान्स आहे. ॲलासडेअर इव्हान्सने प्रशिक्षक आणि सहकारी खेळाडूंचे आभार मानले.
15 वर्षांच्या या दीर्घ प्रवासात मला अनेक चांगल्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. यात माझे सहकारी, प्रशिक्षक आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. त्याच्या मदतीशिवाय मी इतके दिवस क्रिकेट खेळू शकलो नसतो. त्यांनी हा प्रवास अधिक छान बनवला, असं ॲलासडेअर इव्हान्स म्हणाला.
ॲलासडेअर इव्हान्सने कॅनडाविरूद्ध 2009 साली वन डे मध्ये पदार्पण केलं होतं. तर 2012 मध्ये बांगलादेशविरूद्ध पदार्पण केले होते. आपल्या करियमध्ये 41 वन डे आणि 35 टी-20 सामने खेळले असून अनुक्रमे 58 आणि 41 विकेट्स घेतल्या आहेत. दोनवेळा त्याने वन डे आणि टी-20 मध्ये पाच विकेट घेतल्या आहेत.
Alasdair Evans made his debut in 2009 in an ODI against Canada in Aberdeen and went on to win 116 caps for Scotland.#AlasdairEvans #CricketScotland #Insidesport #CricketTwitter pic.twitter.com/tL2ZorLh4n
— InsideSport (@InsideSportIND) September 24, 2024
मला एकदा रात्री कोच पीट स्टँडल यांचा फोन आला. त्यावेळी त्यांनी कॅनडाविरुद्ध ॲबरडीन मैदानावर पदार्पण करण्याची संधी मिळाली. टीममधील अनेक खेळाडू जखमी झाले होते. त्यामुळे माझी प्लेइंग 11 मध्ये निवड झाली होती. स्वप्नातही वाटले नव्हते मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल. म्हणून मला कोचचा फोन आला तेव्हा मला पहिल्यांदा मस्करी करत असल्यासारखं वाटल्याचं ॲलासडेअर इव्हान्स म्हणाले होते. युवा वेगवान गोलंदाजांसाठी ॲलासडेअर इव्हान्स चांगला आदर्श असून ड्रेंसिंग रूममध्ये त्याची कायम आठवण येईल, असं स्कॉटलंडचे मुख्य प्रशिक्षक डग वॉटसन म्हणाले.