शाहीन आफ्रिदीने जसप्रीत बुमराहला भर मैदानात दिल्या शुभेच्छा, भेटवस्तू देत म्हणाला…

IND vs PAK : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. गोड बातमी असल्याने जसप्रीत बुमराह नेपाळ विरुद्धचा सामना खेळला नव्हता. आता पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी परतला असून शाहीन आफ्रिदीने खास गिफ्ट दिलं.

शाहीन आफ्रिदीने जसप्रीत बुमराहला भर मैदानात दिल्या शुभेच्छा, भेटवस्तू देत म्हणाला...
शाहीन आफ्रिदी याने डॅडी बुमराहला दिलं स्पेशल गिफ्ट, शुभेच्छा देत म्हणाला...
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 10:53 PM

मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सुपर 4 फेरीतील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. आता हा सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे. सामना रद्द झाल्यानंतर मैदानात जसप्रीत बुमराह आणि शाहिन शाह आफ्रिदी यांची भेट झाली. जसप्रीत बुमराह वडील झाल्याने त्याला शुभेच्छा देण्यासाठी शाहिन शाह आफ्रिदी आला होता. इतकंच काय तर यावेळी त्याने जसप्रीत बुमराह याला भेटवस्तू दिली. यावेळी शाहीनने त्याला अनोख्या शुभेच्छा दिल्या. जसप्रीत बुमराह आणि पत्नी संजना गणेशन यांना 4 सप्टेंबर रोजी पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. तसेच मुलाचं नाव अंगद असं ठेवलं आहे.

भेटवस्तू देताना शाहीन शाह आफ्रिदी काय म्हणाला?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या ट्विटर हँडलवर आफ्रिदी आणि बुमराह यांच्या भेटीचा व्हिडीओ शेअर केला आहे. “भावा, खूप खूप शुभेच्छा, लहान बाळासाठी छोटसं गिफ्ट, देव त्याला खूश ठेवेल आणि नवीन बुमराह बनेल.” अशा शुभेच्छा शाहीन शाह आफ्रिदीने जसप्रीत बुमराह याला दिल्या.

जसप्रीत बुमराह आणि फिटनेस

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने वर्षभराच्या कालावधीनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. पाकिस्तानच्या विरुद्धच्या पहिल्या सामन्यात गोलंदाजी करता आली नाही. त्यानंतर नेपाळ विरुद्धच्या सामन्यात बाळाच्या जन्मामुळे खेळला नाही. त्यानंतर आता पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळत आहे. मात्र हा सामना पावसामुळे होईल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची धार पाहण्याची अनुभूती मिळेल की नाही? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 24.1 षटकात दोन गडी गमवून 147 धावा केल्या. रोहित शर्मा याने 49 चेंडूत 56, तर शुबमन गिल याने 52 चेंडूत 58 धावा केल्या. मैदानात विराट कोहली नाबाद 8 आणि केएल राहुल नाबाद 17 धावांवर खेळत आहेत. राखीव दिवशीही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल.

दोन्ही संघांचे खेळाडू

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रउफ.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.