Shahid Afridi : आफ्रिदीनं जावई शाहीनच्या दुखापतीची उडवली खिल्ली, मी नकार दिला होता, असं आफ्रिदी का म्हणाला, जाणून घ्या…

किस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी अक्षाचा विवाह तिच्याच देशाचा स्टार क्रिकेटर शाहीन शाह आफ्रिदीशी होणार आहे. त्याच्या मुलीला डॉक्टर व्हायचं आहे, असं शाहिद आफ्रिदी म्हणाला.

Shahid Afridi : आफ्रिदीनं जावई शाहीनच्या दुखापतीची उडवली खिल्ली, मी नकार दिला होता, असं आफ्रिदी का म्हणाला, जाणून घ्या...
आफ्रिदीनं जावई शाहीनच्या दुखापतीची उडवली खिल्लीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 6:51 AM

नवी दिल्ली : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Socila Media) खूप चर्चेत आहे. शाहीन दुखापतीमुळे 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत (Asia cup 2022) सहभागी होणार नाही. ही बातमी आल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे (Ind vs PAK) चाहते आणि दिग्गजांमध्ये जल्लोष सुरू झाला. आता शाहीन आफ्रिदीचा सासरा शाहिद आफ्रिदीनेही (Shahid Afridi) याबाबत एक खोडकर आणि मोठे वक्तव्य केले आहे. शाहिद आफ्रिदीनं ट्विटरवर चाहत्यांना सांगितले की, शाहीनने त्याचे ऐकले नाही त्यामुळे तो जखमी झाला. शाहिद आफ्रिदीनं लिहिले की, ‘मी त्याला याआधीही सांगितले होते की वेगवान गोलंदाज होण्यासाठी त्याला दुखापत होऊ शकते. पण नंतर कळले की तोही आफ्रिदी आहे. यासोबतच हसणारा इमोजीही पोस्ट करण्यात आला आहे.

शाहिद आफ्रिदीचे ट्विट

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी अक्षाचा विवाह तिच्याच देशाचा स्टार क्रिकेटर शाहीन शाह आफ्रिदीशी होणार आहे. हे लग्न कधी होणार हे निश्चित झाले नसले तरी. शाहिदनं सांगितलं की त्यांच्या मुलीला डॉक्टर व्हायचं आहे. ती पाकिस्तान किंवा इंग्लंडमध्ये शिक्षण घेणार की नाही हे अद्याप ठरलेले नाही. शाहिद आफ्रिदीला पाच मुली आहेत. आफ्रिदीला अक्ष, अस्मारा, अंशा, अजवा आणि अर्वा या पाच मुली आहेत.

शाहीन भारत-पाकिस्तान सामन्यात दिसणार नाही

शाहीन आफ्रिदीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या कारणामुळे तो 2022 च्या आशिया कपमधून बाहेर पडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या घरच्या टी-20 मालिकेतही तो सहभागी होऊ शकणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकीय पथकाने त्याला चार ते सहा आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. आशिया चषक 27 ऑगस्टपासून सुरू होणार असून ही स्पर्धा 28 ऑगस्टला खेळवली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील. शाहीन आफ्रिदीने गेल्या वेळी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना खूप त्रास दिला होता. ही टक्कर पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायची होती. मात्र, आता या सामन्यात शाहीन आफ्रिदी अ‍ॅक्शन करताना दिसणार नाही. शाहीन आफ्रिदीच्या जागी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप घोषणा केलेली नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.