Gautam Gambhir Shahid Afridi | गौतम गंभीर याच्या जवळ गेला, पुढे…, आफ्रिदीने काय केलं? व्हीडिओ तुफान व्हायरल
शाहिद आफ्रिदी याने गौतम गंभीर याच्यासोबत जे काही केलं त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पाहा नक्की काय केलं?
दोहा | टीम इंडिया आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी. हे चित्र अजूनही तसंच कायम आहे. मात्र दोन्ही देशातील खेळाडूंमध्ये फार बदल झालाय. आत्ताचे खेळाडू हे एकमेकांच्या फार जवळचे झालेत. दोन्ही देशांचे खेळाडू एकमेकांची आस्थेने चौकशी करतात. सामन्यादरम्यानही दोन्ही टीममध्ये विनोद होतात. मात्र काही वर्षांपूर्वी असं नव्हतं. तेव्हा उभय संघातील सामना हा युद्धापेक्षा कमी नसायचा. दोन्ही टीमचे खेळाडू हे एकमेकांना ठस्सन द्याचे. टीम इंडिया-पाकिस्तान यांचा विषय निघाला की क्रिकेट चाहत्यांना 2007 मधील कानपूर सामन्यातील गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यातील मैदानातील प्रसंग आजही आठवतो. तसाच प्रसंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात घडलाय.
आफ्रिदी आणि गंभीर एकमेकांसमोर आले. लेजेंड्स लीग क्रिकेट 2023 स्पर्धेतील इंडिया महाराजास विरुद्ध एशिया लायन्स यांच्यातील पहिल्या सामन्यात हा सर्व प्रकार घडला. या दोघांचा तो व्हीडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान दोघांमध्ये नक्की काय झालं हे आपण जाणून घेऊयात.
नक्की काय झालं?
तर एशिया लायन्सने इंडिया महाराजाला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 166 धावांचे आव्हान दिले होते. इंडिया महाराजाची बॅटिंग सुरु होती. मैदानात गौतम गंभीर आणि मोहम्मद कैफ खेळत होते. सामना रंगतदार स्थितीत होता.
सामन्यातील 12 वी ओव्हर टाकायला अब्दुल रझाक आला. रझाकच्या पहिल्याच बॉलवर गंभीरने स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बरोबर बॅटवर आला नाही. त्यामुळे बॉल हाताला लागून गंभीरच्या हेल्मेटवर लागला. या दरम्यान गंभीरला बॉल कुठे गेला कळालं नाही. मात्र सुदैवाने गंभीरला इजा झाली नाही. पण आफ्रिदीने पुढे येत गंभीरला लागलं का, अशी जवळ येत चौकशी केली. या दोघांचा व्हीडिओ हा आता व्हायरल होतोय.
आफ्रिदीकडून खेलाडूवृत्तीच दर्शन
'Big-hearted' Shahid Afridi inquires if Gautam Gambhir is ok after that blow ❤️#Cricket pic.twitter.com/EqEodDs52f
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) March 10, 2023
आजपासून काही वर्षांपूर्वी हेच दोघे क्रिकेटच्या मैदानात 2007 साली असेच आमनेसामने आले होते. तेव्हा मात्र हे दोघे हमरीतुमरीवर उतरलेले. दोघांना शांत करण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली होती. मात्र आता या दोन्ही खेळाडूंमधील एकमेकांबद्दलची आस्था पाहून हे दोघे तेच आहेत का, असा सवालही क्रिकेट चाहत्यांमध्ये उपस्थित झाला.
दरम्यान या सामन्यात इंडिया महाराजाचा 9 धावांनी पराभव झाला. विजयासाठी मिळालेल्या 166 धावांच्या प्रत्युतरात इंडिया महाराजाला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 154 धावाच करता आल्या. या पराभवामुळे इंडियाचा कॅप्टन गौतम गंभीर याने केलेली 54 धावांची खेळी व्यर्थ गेली.
इंडिया महाराजा प्लेइंग इलेव्हन | गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा (विकेटकीपर), मुरली विजय, सुरेश रैना, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, स्टुअर्ट बिन्नी, इरफान पठाण, हरभजन सिंग, अशोक दिंडा, प्रवीण तांबे आणि परविंदर अवाना.
एशियन लायन्स प्लेइंग इलेव्हन | शाहिद आफ्रिदी (कॅप्टन), तिलकरत्ने दिलशान, उपुल थरंगा (विकेटकीपर), असगर अफगाण, मिसबाह-उल-हक, पारस खडका, थिसारा परेरा, अब्दुल रज्जाक, इसुरु उडाना, अब्दुर रज्जाक आणि सोहेल तनवीर.