शाहिद आफ्रिदीचा विराटला अजब सल्ला, म्हणाला संघातून…
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं विराटला दिलेल्या सल्ला चर्चीला जातोय. तो नेमका काय आहे, ते जाणून घ्या...
नवी दिल्ली : टी-20 विश्वचषकासाठी (ICC T20 world cup) टीम इंडियाची (Team India) निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेच्या बाउचरनं (South Africa) राजीनामा देणार असल्याचं घोषित केलंय. यातच आता निवृत्तीवरुनच एक बातमी समोर आली आहे. शाहिद आफ्रिदीनं विराट कोहलीला निवृत्तीवरुन एक अजब सल्ला दिला आहे. त्यावरुन चांगलीच चर्चा देखील रंगली आहे. आधीच विराटचं करिअर उंचावत असताना हा अजब-गजब सल्ला नेमका आहे तरी काय, ते जाणून घ्या…
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनं त्याला निवृत्तीबाबत अप्रतिम सल्ला दिलाय. त्याची सध्य चांगलीच चर्चा आहे. सोशल मीडियावर देखील त्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. पण, विराटकडून सध्या भारताला मोठ्या आशा आहेत.
आफ्रिदीनं काय म्हटलंय?
शाहिद आफ्रिदीनं विराट कोहलीला सल्ला दिलाय की त्यानं चांगली कामगिरी करतानाच क्रिकेटला अलविदा म्हणावं आणि संघ सोडू नये. समा टीव्हीसोबतच्या संवाद साधताना आफ्रिदी म्हणाला की, ‘विराट कोहलीनं ज्या पद्धतीनं खेळ दाखवला आहे किंवा त्याची कामगिरी दाखवली आहे. त्यामुळे नाव काढण्यापूर्वी त्याला अडचणीचा सामना करावा लागला. तो चॅम्पियन खेळाडू आहे. पण, एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही निवृत्तीकडं वाटचाल करत असतात. पण, अशा प्रसंगी अभिमानानं निरोप घेणं, हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजं,’ असा सल्ला आफ्रिदीनं विराटला दिलाय.
हे ट्विट वाचा…
Shahid Afridi — “Virat Kohli has struggled to make a huge name for himself. He is a champion. However there does comes a stage in every cricketer’s life where he has to think about retirement. It would be great to see Virat Kohli take retirement at peak of his career.” #AsiaCup
— Arfa Feroz Zake (@ArfaSays_) September 9, 2022
आशिया चषकामुळे आशा वाढल्या
आशिया चषक 2022 मध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली झाली नसली तरी विराट कोहली फॉर्ममध्ये परतल्यानं निश्चितच दिलासा मिळाला होता. विराट कोहलीनं आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावलं. 1021 दिवसांनंतर विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं. विराट कोहलीने आशिया चषक स्पर्धेत 90 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या.
चर्चा अशीही…
विराटविषयी आयपीएल सुरु असताना वेगळीच चर्चा होती. त्याच्यावर त्याचे चाहते संतापले देखील होते. पण, आशिया चषकानंतर सर्वकाही सुरळीत होत असल्याचं दिसतंय. विश्वचषकानंतर विराट मोठा निर्णय घेऊ शकतो. विराट कोहली स्वतःच एखाद्या फॉरमॅटला अलविदा करण्याचा विचार करत आहे. कारण सध्या क्रिकेट विश्वात बरंच काही घडतंय आणि विराट कोहलीच्या शरीरात आता पूर्वीसारखं तिन्ही फॉरमॅटचं ओझं उरलं नाहीये. आता बघूया विराट कोहली काय निर्णय घेतो ते. तो जोपर्यंत काही बोलत नाही तोपर्यंत कोणत्याही रिपोर्टवर किंवा कोणत्याही अंदाजांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही.