वर्ल्डकपमध्ये बुमराहपेक्षा शमी ठरणार सरस! गौतम गंभीरनं सांगितलं कारण

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया जबरदस्त कामगिरी करत आहे. या स्पर्धेत टीम इंडियाच्या फलंदाजीपेक्षा गोलंदाजीची चर्चा होत आहे. भारतीय फलंदाजांपेक्षा गोलंदाज टीम इंडियाला मोक्याच्या क्षणी तारतात. शमीने मागच्या काही सामन्यात भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं आहे.

वर्ल्डकपमध्ये बुमराहपेक्षा शमी ठरणार सरस! गौतम गंभीरनं सांगितलं कारण
मोहम्मद शमी याला सुरुवातीला काही सामन्यात संधी दिली गेली नाही. मात्र शमीला संधी मिळाली तेव्हा त्याने 2 सामन्यात 4 आणि एका सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. शमीच्या नावावर या वर्ल्ड कपमध्ये 16 विकेट्स आहेत. आता शमीकडून न्यूझीलंड विरुद्ध तडाखेदार कामगिरी अपेक्षित आहे.
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 12:09 AM

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यात शमीला बेंचवर बसवण्यात आलं होतं. सुरुवातीच्या चार सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकुरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं होतं. मात्र हार्दिक पांड्याला दुखापत झाली आणि शमीची टीम इंडियामध्ये एन्ट्री झाली. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. मग काय मोहम्मद शमीने आलेल्या संधीचं सोनं केलं. धर्मशाळेत पाच गडी बाद करत त्याने पुढच्या सामन्यासाठी आपलं स्थान पक्कं केलं. शमीने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात 16 गडी बाद केले आहेत. भारताकडून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. शमीमुळे भारताच्या गोलंदाजीची धार आणखी वाढली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद सिराज या तिकडीने जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं. शमीचं हे प्रदर्शन पाहून गौतम गंभीरने एक भाकीत वर्तवलं आहे.

काय म्हणाला गौतम गंभीर?

गौतम गंभीरने एका वेबसाईटशी बोलताना सांगितलं की, मोहम्मद शमी वर्ल्डकपमध्ये बुमराहपेक्षा जास्त गडी बाद करेल. बुमराहने 8 सामन्यात 15 गडी बाद केले आहेत. तर शमीच्या नावावर 16 विकेट्स आहेत. शमीने ही कामगिरी फक्त 4 सामन्यात केली आहे. त्यामुळे बुमराहपेक्षा जास्त गडी बाद करेल.

“बुमराह हा भारतीय गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र आहे, त्यामुळे विरोधी संघ त्याच्या सामना करण्यासाठी तयारी करतात. पण शमीच्या बाबतीत असं नाही. विरोधी संघ अनेकदा विचार करतात की याचा सामना करू आणि तेव्हाचं तेव्हा पाहू. पण अनेकदा असं होतं की तुमचा बेस्ट गोलंदाजाचा इकोनॉमी रेट चांगला असतो. पण त्याच्या खात्यात तितके विकेट्स नसतात.”, असं गौतम गंभीर पुढे म्हणाला.

“विरोधी संघ बुमराह ऐवजी शमीवर अटॅक करू इच्छिते. पण तो आता व्हेरिएशनसह गोलंदाजी करत आहे. पण असं असलं तरी बुमराह एक्स फॅक्टर आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजीला धार मिळाली आहे. त्याच्यामुळे टीम इंडियाला बळ मिळालं आहे. पण मोहम्मद शमी सर्वाधिक विकेट घेईल.” , असंही गौतम गंभीर पुढे म्हणाला.

भारताचा उपांत्य फेरीचा सामना 15 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाजांचा पुन्हा एकदा बोलबाला पाहायला मिळणार आहे. टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी घेतली तर दुसऱ्या डावात शमी आणि बुमराहमध्ये विकेटसाठी स्पर्धा पाहायला मिळेल.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.