Shane Warne Death : शेन वॉर्न याच्या मृत्यूचं खरं कारण आलं समोर, क्रिकेट विश्वात खळबळ!
शेन वॉर्नचा अचानक वयाच्या 52 व्या वर्षी शेन वॉर्नचा 4 मार्च 2022 मध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला होता. मात्र आता त्याच्या मृत्यूची चर्चा पुन्हा होत आहे. कारण शेन वॉर्नच्या मृत्यूशी संबंधित अहवाल नुकताच डॉक्टरांनी प्रसिध्द केला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्न (SHANE WARNE) चांगल्या-चांगल्या खेळाडूंना पाणी पाजायचा. शेन वॉर्न निवृत्तीनंतरची लाईफ मजेत घालवत होता मात्र अचानक वयाच्या 52 व्या वर्षी शेन वॉर्नचा 4 मार्च 2022 मध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला होता. मात्र आता त्याच्या मृत्यूची चर्चा पुन्हा होत आहे. कारण शेन वॉर्नच्या मृत्यूशी संबंधित अहवाल नुकताच डॉक्टरांनी प्रसिध्द केला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.
शेन वॉर्नच्या मृत्यूला कोरोनाची लस कारणीभूत
शेन वॉर्नने COVID mRNA लस घेतली होती. या लसीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. शेन वॉर्नने मृत्यूच्या 9 महिन्याअगोदर लस घेतली होती. शेन वॉर्नला आधीही एकदा हृदयविकाराचा झटका येवून गेला होता, दरम्यान COVID mRNA ही लस घेतल्याच्या 9 महिन्यानंतर शेन वॉर्नचा हृदयविकाराने मृत्यू झाला.
डॉक्टरांच्या अहवालात काय म्हटलंय?
एक ऑस्ट्रेलियन डॉक्टर आणि ब्रिटिश कार्डिओलॉजिस्टन यांनी प्रसिध्द केलेल्या अहवालात म्हटलं आहे की, शेन वॉर्नच्या मृत्यूचं कारण कोरोनाची mRNA लस असू शकते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ख्रिस नील आणि डॉ. असीम मल्होत्रा यांनी प्रसिध्द केलेल्या अहवालात म्हटलं आहे की, mRNA लसीमुळे कोरोनरी या रोगाचा प्रसार झपाट्यानं होऊ शकतो. विशेष म्हणजे, ज्यांना आधीच हृदयाशी संबंधित रोग आहेत, त्यांच्यासाठी ही लस धोकादायक ठरण्याची शक्यता होती.
डॉ. मल्होत्रा यांनी शेन वॉर्नच्या लाईफस्टाईलबाबत बोलताना अनेक खुलासे केले आहेत. शेन वॉर्नला स्मोकिंग करण्याची सवय होती. त्याची दिनचर्या फारशी हेल्दी नव्हतीच, त्याचं वजनही वाढलेलं होतं. दरम्यान डॉ. मल्होत्रा यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूबद्दलही सांगितलं. डॉ. मल्होत्रा यांच्या वडिलांचा मृत्यू फायझर लसीचे दोन डोस घेतल्यानंतर झाला होता. लस घेतल्यानंतर त्यांना हृदयाशी संबंधित समस्या जाणवायला लागल्या आणि त्यांची प्रकृती बिघडली.
जगभरात हृदय विकाराचे वाढते प्रमाण
दरम्यान, जगभरात कोविड लसीकरण झाल्यानंतर हृदयासंबंधी समस्या वाढताना दिसत आहेत. कोविड व्हॅक्सिन आणि हार्ट अटॅकच्या संबंधावर अनेक संशोधन होत असून लवकरच याचे अहवालही प्रसिध्द होणार आहेत. दरम्यान, भारतातही ICMR कडून हृदय विकाराच्या वाढत्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे.