Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shane Warne : फक्त गोलंदाजीच नाही तर यामुळेही चांगलाच चर्चेत आला होता शेन वॉर्न

. शेन वॉर्न त्याच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे तर नेहमीच चर्चेत राहिला. मात्र तो इतरही कारणांमुळे चर्चेत राहिला. इतिहासातील काही काही घटना पाहिल्यास अनेक मोठ्या नावांशी शेन वॉर्नचं नाव जोडलं गेले होते.

Shane Warne : फक्त गोलंदाजीच नाही तर यामुळेही चांगलाच चर्चेत आला होता शेन वॉर्न
शेन वॉर्नची चर्चेतली प्रकरणंImage Credit source: circle of cricket
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 9:19 PM

मुंबई : महान ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेर्न वॉर्न (Shane Warne) यांनी आज जगाचा निरोप घेतलाय. शेन वॉर्नसारखा स्पिनचा मास्टर हरपल्याने क्रिकेट विश्वावर शोककळा  (Shane Warne Passes Away) पसरली आहे. शेन वॉर्न त्याच्या जबरदस्त गोलंदाजीमुळे तर नेहमीच चर्चेत राहिला. मात्र तो इतरही कारणांमुळे चर्चेत राहिला. इतिहासातील काही काही घटना पाहिल्यास अनेक मोठ्या नावांशी शेन वॉर्नचं नाव जोडलं गेले होते. असेच एक नाव ब्रिटिश अभिनेत्री आणि मॉडेल एलिझाबेथ हर्ले (Elizabeth harle)सोबत चर्चेत होते, तिचे शेन वॉर्नशी 2010 मध्ये नातेसंबंध मीडियात खळबळ माजवणारे होते. वॉर्न म्हणायचा मला अजूनही त्या प्रकरणाची भिती वाटते. हर्ली 2011 मध्ये वॉर्नच्या मेलबर्नच्या घरात राहायला गेली आणि 2011 मध्ये दोघांनी लग्न केले. त्यानंतर दोनच वर्षात गोष्टी चिघळल्या आणि त्यांनी 2013 मध्ये ते वेगळे झाले.

वॉर्नने मुलाखतीत सांगिलेल्या आठवणी

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वॉर्नने याबाबत काही खास गोष्टी सांगितल्या होत्या.फॉक्स क्रिकेटच्या ए वीक विथ वॉर्नीच्या पाचव्या भागावर वॉर्नने हर्लेसोबतचे त्याचे नाते आठवले. त्याने सहा महिन्या त्याच्या मुलांशी तिची ओळख करून दिली नव्हती म्हणत. तिच्या आठवणींना उजाळा दिला. शेन वॉर्नची अशी अनेक प्ररण त्याची गाजली आहेत. आज त्याच्या जाण्याने ही सर्व प्रकरण पुन्हा चर्चेत आली आहे. शेन वॉर्नचे भारतातीलही अनेक किस्से आहेत. त्यावरून काही वेळा वॉर्न वादातही सापडला होता.

राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनवलं

शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी 2007 मध्ये त्याने सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. 1992 मध्ये पदार्पण करणारा वॉर्न 1999 मध्ये ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधारही बनला, पण त्याला कर्णधार होण्याची संधी कधीच मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर, वॉर्नने प्रथमच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाचे नेतृत्व केले आणि पहिल्याच सत्रात राजस्थान रॉयल्सला चॅम्पियन बनवले. आपल्या स्पिनच्या जोरावर शेन वॉर्न जगातील अनेक महान फलंदाजांना धडकी भरवत होता. क्रिकेट जगातात शेन वॉर्नसारखा स्पिनर पुन्हा होणार नाही, अशी भावना क्रिकेट चाहते व्यक्त करत आहेत.

Shane Warne चं स्वप्न, जे ऑस्ट्रेलियाला जमलं नाही ते भारताने पूर्ण केलं

Shane Warne Death : ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न याचं निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा

PAK vs AUS: पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया सिरीजवर दहशतवादाचं सावट, सामन्याच्या पहिल्याच दिवशी पेशावरमध्ये स्फोट

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.