Shane Warne death: वॉर्नच्या पुतळ्यासमोर मटण, बियर, सिगारेट ठेवून वाहिली अनोखी श्रद्धांजली

| Updated on: Mar 05, 2022 | 1:10 PM

ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या (Shane Warne) अकाली निधनाचा क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. काल संध्याकाळी थायलंडच्या (Thailand) एका व्हिलामध्ये शेन वॉर्न मृतावस्थेत आढळला.

Shane Warne death: वॉर्नच्या पुतळ्यासमोर मटण, बियर, सिगारेट ठेवून वाहिली अनोखी श्रद्धांजली
शेन वॉर्नला श्रद्धांजली
Follow us on

सिडनी: ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या (Shane Warne) अकाली निधनाचा क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. काल संध्याकाळी थायलंडच्या (Thailand) एका व्हिलामध्ये शेन वॉर्न मृतावस्थेत आढळला. ह्दयविकाराच्या झटक्याने शेन वॉर्नचा मृत्यू झाल्याची दाट शक्यता आहे. शेन वॉर्न आता या जगात नाही, यावर अजूनही अनेकांचा विश्वास बसत नाहीय. ते दु:ख पचवणं जड जातय. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या (MCG)  बाहेर शेन वॉर्नचा एक पुतळा आहे. आज सकाळपासूनच मेलबर्नमध्ये असलेल्या या स्टॅच्यूच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी झाली आहे. लोकांनी या स्टॅच्यूच्याखाली शेन वॉर्नच्या पसंतीच्या वस्तू ठेवून आपल्या लाडक्या क्रिकेटपटूला आठवलं. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. थायलंडच्या  एका व्हिलामध्ये शेन वॉर्न यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 52 वर्षांचे होते.

शेन वॉर्नचं वय फार नव्हतं. त्याने वयाच्या 52 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. वॉर्नच्या चाहत्यांनी त्याच्या पुतळ्याच्या खाली फूलं, बियर, सिगारेट आणि मटण ठेवून त्याला अनोखी श्रद्धांजली वाहिली. शेन वॉर्नला हे पदार्थ आवडायचे. ‘

त्याला मोठा ब्रेक हवा होता म्हणून…

याआधी आज सकाळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक घोषणा केली. यापुढे एमसीजीच्या द ग्रेट साऊदर्न स्टँडचं नाव एसके वॉर्न असेल. स्पिंगच्या किंगला ही कायमस्वरुपी श्रद्धांजली असेल. शेन वॉर्नने ASHES मालिके दरम्यान फॉक्स न्यूजसाठी काम केलं होतं. ASHES मालिकेनंतर त्याला तीन महिन्यांचा मोठा ब्रेक हवा होता. म्हणूनच तो आपल्या मित्रांसमवेत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी थायलंडला गेला होता.

अखेरच्या क्षणी कोण सोबत होतं?

अखेरच्या क्षणी शेन वॉर्न सोबत त्याचे मित्र होते. सर्वप्रथम वॉर्नच्या मित्रानेच त्याला जमिनीवर निपचित पडलेलं पाहिलं. दुपारच्या जेवणासाठी म्हणून तो शेन वॉर्नला बोलवायला त्याच्या रुममध्ये गेला होता. अनेक हाका मारुनही शेन वॉर्न काहीच प्रतिसाद देत नव्हता. “आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी आम्ही शेन वॉर्नला जमिनीवर निपचित पडलेलं पाहिलं” असं रुग्णावाहिकेच्या कर्मचाऱ्याने सांगितलं. शेन वॉर्नच्या मित्राने त्याला सीपीआर देऊन त्याचा श्वासोश्वास सुरु करण्याचा प्रयत्न केला. आम्ही थाय इंटरनॅशनल हॉस्पिटलकडेही मदत मागितली, असे शेन वॉर्नसोबत असलेल्या मित्राने सांगितले. सेवन न्यूज डॉट. कॉमने हे वृत्त दिलं आहे.