Umran Malik : इंग्रजांचे षटकार खेचून देणार हा गोलंदाज, उमरानच्या धडाकेबाज कामगिरीचं शशी थरूरांकडून कौतुक
रविवारी सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना उमरान मलिकने किंग्जविरुद्ध चार विकेट घेतल्या होत्या. रविवारी झालेल्या सामन्यात मलिकने शेवटच्या षटकात तीन बळी घेतले. ही कामगिरी पाहिल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूरही त्यांचे चाहते झाले आहेत.
मुंबई : जम्मू-काश्मीरचा झंझावाती गोलंदाज उमरान मलिकने (Umran Malik) आयपीएलच्या 15व्या हंगामात दहशत निर्माण केली आहे. सनरायझर्स हैदराबादकडून (SRH) खेळताना त्याने पंजाब किंग्जविरुद्ध (Panjab Kings) चार विकेट घेतल्या होत्या. रविवारी झालेल्या सामन्यात मलिकने शेवटच्या षटकात तीन बळी घेतले. ही कामगिरी पाहिल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूरही त्यांचे चाहते झाले आहेत. त्यांनी ट्विट करून उमरानचे कौतुक केले असून टीम इंडियात त्याचा समावेश करण्याची शिफारसही केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर उमरानचा संघात समावेश केला तर तसे केल्यास तो जसप्रीत बुमराहसह ब्रिटीशांचे षटकारही खेचू शकतो. उमरानने आयपीएलच्या चालू हंगामात सहा सामन्यांत नऊ विकेट्स घेतल्या आहेत. सध्या उमरानची चांगलीच चर्चा आहे. त्याच्या कामगिरीवर सोशल मीडियावर त्याचे चाहते देखील त्याचं चांगलंच कौतुक करता आहेत. विशेष म्हणजे कालच्या सामन्यानंतर तर चाहत्यांनी उमरानला डोक्यावर घेतलंय.
थरूर नेमकं काय म्हणालेत?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘आम्हाला लवकरात लवकर या खेळाडूचा भारतीय संघात समावेश करण्याची गरज आहे. किती अद्भुत प्रतिभा आहे. त्याच्या प्रतिभेचा वेळीच फायदा करून घेतला पाहिजे. ग्रीन टॉप पिचवर खेळल्या जाणाऱ्या टेस्ट मॅचसाठी त्याला इंग्लंडला नेलं पाहिजे. तो आणि बुमराह आपल्या गोलंदाजीने मोठ्यांना घाबरवतील.’
शशी थरूर यांचे ट्विट
We need him in India colours asap. What a phenomenal talent. Blood him before he burns out! Take him to England for the Test match greentop. He and Bumrah bowling in tandem will terrify the Angrez! #UmranMalik https://t.co/T7yLb1JapM
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 17, 2022
सामन्यात काय झालं?
सनरायझर्स पंजाब यांच्यातील सामन्यात केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचा डाव 20 षटकात 151 धावांवर आटोपला. त्याच्यासाठी लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक 60 धावा केल्या. हैदराबादकडून उमरान मलिकने चार आणि भुवनेश्वर कुमारने तीन बळी घेतले. सनरायझर्स हैदराबादने 18.5 षटकांत तीन विकेट गमावत 152 धावा करून सामना जिंकला. एडन मार्करामने नाबाद 41, निकोलस पूरनने नाबाद 35, राहुल त्रिपाठीने 34 आणि अभिषेक शर्माने 31 धावा केल्या. पंजाबकडून राहुल चहरने दोन बळी घेतले. राहुल त्रिपाठीने 34 आणि अभिषेक शर्माने 31 धावा केल्या. पंजाबकडून राहुल चहरने दोन बळी घेतले. राहुल त्रिपाठीने 34 आणि अभिषेक शर्माने 31 धावा केल्या. पंजाबकडून राहुल चहरने दोन बळी घेतले.
इतर बातम्या
Anupam Kher: वयाच्या 67व्या वर्षी अनुपम खेर यांचं थक्क करणारं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन; नेटकरी म्हणाले..
Vaishakh Mahina 2022 | वैशाख वणव्यात सणांची लयलूट, जाणून घ्या या महिन्यातील महत्त्वाचे सण
बातमी छापली म्हणून पत्रकाराला अश्लील शिविगाळ, जीवे मारण्याचीही धमकी! महाराष्ट्रात कुठे घडला प्रकार?