Video : शिखर धवनच्या बासरीचे मधुर स्वर, ‘गब्बर’ने वाजवलेलं ‘ओठो से छू लो तुम..’ एकदा ऐकाच!

नेहमी बॅटने भल्यभल्या दिग्गजांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या शिखरने रोमँटिक गझल वाजवून फॅन्सना 'सुरेल रोमँटिसिझम' अनुभवण्याची संधी दिलीय. (Shikhar Dhawan Flute Playing Instagram Video)

Video : शिखर धवनच्या बासरीचे मधुर स्वर, 'गब्बर'ने वाजवलेलं 'ओठो से छू लो तुम..' एकदा ऐकाच!
नेहमी बॅटने भल्यभल्या दिग्गजांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या शिखरने रोमँटिक गझल वाजवून फॅन्सना 'सुरेल रोमँटिसिझम' अनुभवण्याची संधी दिलीय.
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 8:48 AM

मुंबई : ‘ओठो से छू लो तुम….’ जगजीत सिंह यांची ही गझल ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या कित्येक तरुण-तरुणींना आजही भुरळ घालते. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आजही तरुण या गाण्याचा आधार घेतात.  पण जर हेच गाणं एका क्रिकेटरने बासरीतून वाजवलं तर… होय भारताचा आक्रमक सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) आपल्यातलं लपलेलं कौशल्य जगासमोर आणलं आहे. त्याने जगजीत सिंह यांची ‘ओठो से छू लो तुम….’ ही अजरामर गझल बासरीतून मंजुळ सुरावटींनी रसिकांना ऐकवली आहे. गब्बरच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (Shikhar Dhawan Flute Playing Instagram Video)

शिखरच्या बोटांची जादू

नेहमी बॅटने भल्यभल्या दिग्गजांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या शिखरने रोमँटिक गझल वाजवून फॅन्सना ‘सुरेल रोमँटिसिझम’ अनुभवण्याची संधी दिली. शिखरने आपल्या फॅन्सना कोरोनाच्या या निगेटिव्ह काळात बासरीच्या माध्यमातून प्रेमाचा सुंदर प्रवास ऐकवलाय. तो इतक्या सुंदर पद्धतीने बासरी वाजवतोय, त्याची बोटे बासरीवरुन इतक्या मुक्तपणे फिरतायत की पाहणाऱ्याला तो पट्टीच्या बासरी वादक वाटतोय.

शिखर धवनने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये तो जगजीत सिंह यांच्या ‘ओठो से छू लो तुम….’ या गझलेची धून वाजवतोय. शिखरच्या या धूनने अनेकांच्या हृदयाच्या तारा छेडल्यात. 1 मिनिट 26 सेकंदाच्या या व्हिडीओमधून शिखरने आपल्यातलं वादन कौशल्य जगाला दाखवून दिलंय.

शिखरच्या संगीताची मोहिनी फॅन्सवर मोहिनी

शिखरचा बासरी वादनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. हजारो फॅन्सने शिखरच्या कौशल्याचं कौतुक केलंय. शिखरच्या संगीताची मोहिनी फॅन्सवर पडलीय. त्याच्या व्हिडीओखाली फॅन्सनी हर्ट इमोजींचा पाऊस पाडलाय. अनेकांनी शिखरची सुरावट आपल्या इन्स्टास्टोरीला पोस्ट केलीय.

श्रीलंका दौऱ्यावर शिखरकडे कर्णधारपदाची धुरा

भारताच्या इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरु आहे. पण शिखर धवनला या दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली नाहीय. भारताची दुसरी टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात शिखर धवनकडे भारताच्या कर्णधारपदाची धुरा दिली जाऊ शकते. श्रीलंका दौऱ्यावरच्या संघात जवळपास नवोदित खेळाडू असणार आहे.

आयपीएलमध्ये शिखरचा बोलबाला

यंदाच्या आयपीएलमध्ये शिखर धवनची बॅट चांगलीच तळपली. त्याने दिल्लीकडून खेळताना 8 सामन्यांत 134.28 च्या स्ट्राईक रेटने 380 रन्स काढले. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. मुंबईकर पृथ्वी शॉच्या साथीने शिखरने दिल्लीला अनेक चांगल्या सलामी भागिदारी रचून दिल्या.

(Shikhar Dhawan Flute Playing Instagram Video)

हे ही वाचा :

अनुष्का शर्माचा कोणता सिनेमा आवडतो?, विराट कोहलीने सांगितली ‘दिल की बात!’

WTC Final : फायनलमध्ये भारताला मात देण्यासाठी……, न्यूझीलंडच्या बोलरने पुन्हा टीम इंडियाला डिवचलं!

Photo : हार्दिक पांड्याची 27 व्या वर्षी उंच भरारी, गुजरातमध्ये आलिशान घर; जीम, थिएटर आणि बरंच काही…!

संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.