Video : शिखर धवनच्या आयुष्यात पुन्हा एकदा तरुणीची एन्ट्री! लग्न करणार का? रंगली चर्चा

शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. नुकतंच लीजेंड्स क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसला होता. असं असताना वैयक्तिक आयुष्यातही बऱ्याच उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मागच्या वर्षी शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांच्यात काडीमोड झाला होता. आता शिखर धवनच्या आयुष्यात नवी तरुणी आल्याची चर्चा रंगली आहे.

Video : शिखर धवनच्या आयुष्यात पुन्हा एकदा तरुणीची एन्ट्री! लग्न करणार का? रंगली चर्चा
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 4:37 PM

क्रिकेटपटू शिखर धवन कायम या ना त्या कारणाने चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याचे रील चर्चेचा विषय ठरतात. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चा होत असते. मागच्या वर्षी शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांच्यात काडीमोड झाला होता. तेव्हापासून शिखर धवन एकटा आहे. मध्यंतरीच्या काळात मुलाची भेट होत नसल्याची भावूक पोस्टही त्याने टाकली होती. असं सर्व घडामोडी आयुष्यात घडत असताना एका व्हिडीओमुळे सोशल मिडियावर चर्चा रंगली आहे. शिखर धवन एका नव्या तरूणीसोबत कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. शिखर धवनला मिस्ट्री गर्लसोबत एअरपोर्टवर स्पॉट केलं गेलं आहे. त्यामुळे ही मुलगी कोण आहे? इथपासून तो पुन्हा एकदा प्रेमात पडला का? दुसरं लग्न करणार का? असे एक ना अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत. पण ती मुलगी कोण आणि तिच धवनसोबत काय नातं आहे याबाबत अधिकृत अशी काहीच माहिती नाही. पण इतकं मात्र खरं आहे की, शिखर धवनच्या आयुष्यात बरंच काही घडत आहे.

शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांचा गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात घटस्फोट झाला आहे. त्यामुळे शिखर धवन नव्या तरुणीसोबत दिसणं खूप काही सांगून जातं. त्यामुळे येत्या काही दिवसात नवं नातं समोर येतं का? हे पाहणं औत्सुक्याचं आहे. व्हिडीओनुसार, शिखर धवन ब्लू टीशर्ट आणि ब्लॅक कार्गो घातली आहे. तर त्याच्या सोबत एक तरूणी दिसत आहे. याच मुलीबाबत चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे तरुणी स्वत: कॅमेऱ्यात चित्रित होणार नाही याची काळजी घेत होती. तसेच लाजताना दिसली. शिखर धवन आणि तिचा एकत्रिकपणे कोणताच फोटो किंवा व्हिडीओ येऊ नये याची काळजी घेत होती. ती त्याच्यापासून लांबच फिरत होती. त्यामुळे संशयाला वाव असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणँ आहे.

डावखुऱ्या शिखर धवनने या वर्षीच ऑगस्टमध्ये क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 269 सामने खेळले आहेत. यात 24 शतकं आणि 44 अर्धशतकं ठोकली आहेत. त्याने 10867 धावा केल्या आहेत. भारतासाठी वनडे वर्ल्डकप 2015 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 51.50 च्या सरासरीने 8 सामन्यात 412 धावा केल्या होत्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.