IPL 2022, GT vs PBKS, Orange cap : पंजाब किंग्ससमोर बलाढ्य गुजरातचा पराभव, ऑरेंज कॅपमध्ये शिखर धवनची आगेकूच
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कालच्या सामन्यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया.
मुंबई: आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील मंगळवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने (PBKS) काल बलाढ्य गुजरात टायटन्सचा (GT) पराभव केला. पंजाबने आठ विकेट आणि तब्बल 24 चेंडू राखून विजय मिळवला. गुजरात टायटन्सचा स्पर्धेतील हा दुसरा पराभव आहे. आतापर्यंत दहा पैकी आठ सामने त्यांनी जिंकले आहेत. मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने 10 पैकी पाच सामन्यात विजय तर पाच सामन्यात पराभव झाला आहे. प्लेऑफमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी पंजाबला काल विजय आवश्यक होता. कालच्या विजयामुळे पंजाब किंग्सला दोन पॉइंटस मिळालेच आहेत. पंजाब किंग्सचे हिरो कागिसो रबाडा, सलामीवीर शिखर धवन, भानुका राजपक्षे आणि लिव्हिंगस्टोन आहेत. शिखर धवनने 53 चेंडूत नाबाद 62 आणि लिव्हिंगस्टोनने 10 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या. लिव्हिंगस्टोनच्या बॅटिंगमुळे चार ओव्हर आधीच मॅच संपली. त्याने नेहमीच्या स्टाइलमध्ये फटकेबाजी केली. लिव्हिंगस्टोनने दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले. यानंतर ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये काय बदल झालाय पाहुया.
ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल
आयपीएलच्या ऑरेंज कॅप टेबल पाहिल्यास अद्यापही ऑरेंज कॅपवर बटलर राज कायम आहे. जॉस बटलर पहिल्या क्रमांकावर असून त्याने 588 धावा काढल्या आहे. केएल राहुल हा दुसऱ्या क्रमांकावर असून 451 धावा काढल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवनने आगेकूच केली आहे. त्याने 369 धावा काढल्या आहेत. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर अभिषेक शर्मा आहे. त्याने 324धावा आयपीएलच्या या सीजनमध्ये काढल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर श्रेयस अय्यर आहे. त्याने 324 धावा आतापर्यंत काढल्या आहेत.
ऑरेंज कॅपचा टेबल
फलंदाज | धावा |
---|---|
जोस बटलर | 718 |
केएल राहुल | 537 |
डी कॉक | 502 |
शिखर धवन | 460 |
हार्दिक पांड्या | 453 |
कोणाला दिली जाते ऑरेंज कॅप
दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.
शिखरच्या 53 चेंडूत 62 धावा
144 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात चांगली झाली नाही. जॉनी बेयरस्टो अवघ्या एक रन्सवर आऊट झाला. मोहम्मद शमीने त्याला प्रदीप सांगवानकरवी झेलबाद केलं. पण त्यानंतर शिखर धवनने भानुका राजपक्षेच्या साथीने मिळून डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. राजपक्षे 28 चेंडूत 40 तर शिखरने 53 चेंडूत 62 धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने तर 10 चेंडूत 30 धावा फटकावून चार षटक राखून मॅचच संपवून टाकली.