Shimron Hetmyer vs Jasprit Bumrah IPL 2022: हेटमायर आणि बुमराहची टक्कर MI vs RR सामन्याचा निकाल ठरवणार!

IPL 2022, MI vs RR : गुणतालिका पाहिली तर मुंबईची धार राजस्थानसमोर कमी दिसतेय. पण आयपीएलचे सर्वात मोठे वास्तव हे आहे की येथे सामने कधीही फिरतात.

Shimron Hetmyer vs Jasprit Bumrah IPL 2022: हेटमायर आणि बुमराहची टक्कर MI vs RR सामन्याचा निकाल ठरवणार!
Shimron Hetmyer vs Jasprit Bumrah IPL 2022Image Credit source: BCCI / AFP
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 10:00 AM

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्सचे पदार्पण राजस्थान रॉयल्ससारखे ‘रॉयल’ नव्हते. राजस्थानने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एकतर्फी विजय मिळवून स्पर्धेची दणक्यात सुरुवात केली होती. त्याचवेळी मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. अशा स्थितीत आता मुंबईला दुसरा सामना जिंकायचा आहे. त्याचबरोबर राजस्थानलाही आपला विजयरथ सुरुच ठेवायचा आहे. आजच्या सामन्यात शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) हा अष्टपैलू गोलंदाज राजस्थानसाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. त्याचबरोबर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मुंबई इंडियन्ससाठी मोठी भूमिका बजावू शकतो. पॉइंट्स टॅलीचे ताजे ट्रेंड्स पाहता मुंबईची धार राजस्थानसमोर कमकुवत दिसते. पण आयपीएलचे सर्वात मोठे वास्तव हे आहे की येथे सामने कधीही फिरतात. यात जर एक्स फॅक्टर खेळाडूंच्या हातात सूत्र असतील तर त्या सामन्याचा निकाल सांगणं सर्वात अवघड आहे.

मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यात शिमरॉन हेटमायर आणि जसप्रीत बुमराह हे दोन एक्स फॅक्टर खेळाडू आहेत. त्यामुळे आजच्या सामन्याचा निकाल प्रामुख्याने या दोघांच्या हातात आहे.

हेटमायर vs SRH

शिमरॉन हेटमायरचा सध्याचा फॉर्म जबरदस्त आहे. सनरायझर्सविरुद्ध, त्याने सुमारे 247 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याने सनरायझर्सविरुद्ध फक्त 13 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये 5 चेंडू सीमापार पाठवले गेले, ज्यामध्ये 3 षटकार होते. 13 चेंडूत त्याने एकूण 32 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

बुमराह vs DC

दुसरीकडे, बुमराहचा सध्याचा फॉर्म हेटमायरच्या अगदी उलट आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बुमराहच्या गोलंदाजीची धार पाहायला मिळाली नाही. त्याने 3.2 षटके गोलंदाजी केली आणि त्यात 43 धावा दिल्या, विशेष म्हणजे त्याला एकही विकेट मिळाली नाही.

हेटमायर vs बुमराह

हेटमायर विरुद्ध बुमराह यांच्यात टी-20 मध्ये सामना होतो, तेव्हा मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाचं पारडं जड दिसतं. हेटमायर आणि बुमराह हे दोघे टी-20 मध्ये 6 वेळा आमनेसामने आले आहेत. हेटमायर या 6 डावात 3 वेळा बुमराहचा बळी ठरला आहे. त्याने 6 डावात बुमराहचे 13 चेंडू खेळले आणि केवळ 12 धावा केल्या. यादरम्यान हेटमायरच्या बॅटमधून फक्त एक चौकार आला आहे.

आता हाच आकड्यांचा खेळ आजच्या सामन्यातही दिसला तर राजस्थानच्या अडचणी वाढताना दिसतील आणि मुंबई इंडियन्सचा विजयाचा मार्ग सुकर होताना दिसू शकतो. मात्र हेटमायरचा सध्याचा फॉर्म खूप महत्त्वाचा आहे.

इतर बातम्या

Shahrukh Khan on Andre Russell: आंद्रे रसेल नामक वादळावर शाहरुख खान खूश, म्हणाला, ‘बऱ्याच दिवसांनी…’

IPL 2022 points table : पंजाबविरुद्ध केकेआर विजयी, आयपीएलमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

IPL 2022, MI vs RR Live Streaming: जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल मुंबई विरुद्ध राजस्थान सामना

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.