Team India: टीम इंडियात अचानक बदल, या खेळाडूचा समावेश, नक्की कारण काय?
Indian Cricket Team: टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियात अचानक स्टार ऑलराउंडरची एन्ट्री झाली आहे. जाणून घ्या सविस्तर.
टीम इंडिया 27 जून रोजी इंग्लंड विरुद्ध आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सेमी फायनल सामना खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. अशात टीम इंडियाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियात अचानक मोठा बदल करण्यात आला आहे. एका खेळाडूला झालेल्या दुखापतीमुळे टीम इंडियात हा बदल केला गेला आहे. टीम इंडियात झिंबाब्वे दौऱ्यासाठी बदल करण्यात आला आहे. टीम इंडिया वर्ल्ड कप स्पर्धेनंतर झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयने या दौऱ्यासाठी 24 जून रोजी भारतीय संघाची घोषणा केली होती. मात्र 48 तासांच्या आत बदल करण्यात आला आहे.
टीम इंडियात नितीश रेड्डी याचा समावेश करण्यात आला होता. मात्र नितीश रेड्डीला याला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे ऑलराउंडर शिवम दुबे याचा भारतीय संघात झिंबाब्वे दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया झिंबाब्वे दौऱ्यात शुबमन गिल याच्या नेतृत्वात 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे.
दरम्यान टीम इंडियाचे झिंबाब्वे विरुद्धचे पाचही सामने हे एकाच ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. या पाचही सामन्यांचं आयोजन हे हरारे स्पोर्ट्स क्लब येथे करण्यात आलं आहे. या मालिकेला 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे. तर पाचवा आणि अखेरचा सामना हा 14 जुलै रोजी होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय निवड समितीने अनेक युवा खेळाडूंचा समावेश केला आहे. तुषार देशपांडे, रियान पराग आणि अभिषेक शर्मा या आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या त्रिकुटाला निवड समितीने पहिल्यांदाच संधी दिली आहे.
झिंबाब्वे विरुद्ध इंडिया टी 20 सीरिजचं वेळापत्रक
पहिला सामना, 6 जुलै दुसरा सामना, 7 जुलै तिसरा सामना, 10 जुलै चौथा सामना, 13 जुलै पाचवा सामना, 14 जुलै.
टीम इंडियाचा सुधारित संघ: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकटेकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर ), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे आणि शिवम दुबे.