“अनियंत्रित मन…” पाकिस्तानच्या शोएब अख्तरकडून भगवान श्रीकृष्णाच्या फोटोसह गीतेतील श्लोक पोस्ट, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

| Updated on: Jul 02, 2024 | 9:01 AM

Shoaib Akhtar posts the Geeta Shlok: 48 वर्षीय शोएब अख्तरने यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे टी20 विश्वविजेतेपद पटकवल्यानंतर अभिनंदन केले होते. त्यावेळी अख्तरने लिहिले होते की, 'रोहित शर्मा याने करुन दाखवले. भारतीय संघ या विजयाचा दावेदार होता.'

अनियंत्रित मन... पाकिस्तानच्या शोएब अख्तरकडून भगवान श्रीकृष्णाच्या फोटोसह गीतेतील श्लोक पोस्ट, सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Bhagavad Gita
Follow us on

Shoaib Akhtar posts the Geeta Shlok: भगवद्गीता प्रत्येक हिंदूंसाठी सर्वात पवित्र आणि महान ग्रंथ आहे. भगवद्गगीतेमधील तत्वज्ञान संपूर्ण जगाने मान्य केले आहे. त्यामुळे जगातील जवळपास सर्वच भाषांमध्ये भगवद्गीता ग्रंथ आला आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी त्यांचा प्रिय शिष्य अर्जुन याला दिलेले ज्ञान महर्षी व्यास यांनी सर्वांसाठी भगवद्गीतेच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले. त्यामुळे हजारो वर्षानंतर भगवद्गीतेचे महत्व अबाधित आहे. पाकिस्तानमध्ये भगवद्गीतेचे महत्व काही जणांनी ओळखले आहे. त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने भगवद्गगीतेचा एक श्लोक भगवान श्रीकृष्णांच्या फोटोसह त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. शोएब अख्तर याच्या या पोस्टची जगभरात चर्चा सुरु झाली आहे. ही पोस्ट वेगाने व्हायरल झाली आहे. त्याच्यावर अनेक प्रकारच्या कॉमेंट येत आहेत.

काय लिहिले शोएबने पोस्टमध्ये

शोएब अख्तर यांने भगवद्गीतेवरील एक श्लोक लिहिला आहे. सोबत भगवान कृष्णाचा फोटो पोस्ट करत अख्तरने लिहिले की, “अनियंत्रित मनापेक्षा मोठा शत्रू नाही.” मात्र, शोएब याने नंतर ही त्याची पोस्ट काढून टाकली. मात्र तोपर्यंत ती व्हायरल झाली होती. आता अनेक जण ही पोस्ट स्क्रीन शॉटसह व्हायरल करत आहेत.

पोस्ट का डिलीट केली?

शोएब अख्तर याने भगवद्गीतेचा श्लोक पोस्ट केल्याने अनेकांना खूप आश्चर्य वाटत आहे. कारण अध्यात्मिक पोस्ट शोएब अख्तर याने कधी टाकली नाही. यापूर्वीही त्याने अधूनमधून अशा पोस्ट केल्या आहेत. परंतु आता त्याच्या या पोस्टमागचा हेतू काय होता हे स्पष्ट झाले नाही. तसेच अख्तरने ही पोस्ट नंतर त्याच्या इन्स्टाग्रामवरून काढून का टाकली? यावर चर्चा सुरु झाली आहे.

हे सुद्धा वाचा

शोएबने यापूर्वी टीम इंडियाचे केले अभिनंदन

साहजिकच शोएब अख्तर याच्या या पोस्टवर पाकिस्तानकडून तिखट प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे त्याने ही पोस्ट काढली असणार, अशी चर्चा सुरु आहे. 48 वर्षीय शोएब अख्तरने यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे टी20 विश्वविजेतेपद पटकवल्यानंतर अभिनंदन केले होते. त्यावेळी अख्तरने लिहिले होते की, ‘रोहित शर्मा याने करुन दाखवले. भारतीय संघ या विजयाचा दावेदार होता.’