…म्हणून पाकिस्तानी क्रिकेटर ‘स्ट्रीट स्मार्ट’ ठरतात, बाबर आझमचा VIDEO शेअर करत शोएब अख्तरकडून कौतुक

शोएब अख्तरने (Shaoib Akhtar) पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमचा (Babar Azam) एक व्हिडीओ शेअर करत पाकिस्तानी क्रिकेटपटू कसे स्मार्ट असतात, याचं एक उदाहरण सादर केलं आहे.

...म्हणून पाकिस्तानी क्रिकेटर 'स्ट्रीट स्मार्ट' ठरतात, बाबर आझमचा VIDEO शेअर करत शोएब अख्तरकडून कौतुक
Babar Azam
Follow us
| Updated on: Apr 19, 2021 | 7:26 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने (Shaoib Akhtar) पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमचा (Babar Azam) एक व्हिडीओ शेअर करत, पाकिस्तानी क्रिकेटपटू स्मार्ट कसे असतात, याचं एक उदाहरण सादर केलं आहे. शोएब अख्तरने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये बाबर आझम घरात क्रिकेट खेळताना (Indoor cricket) दिसतोय. या व्हिडीओमध्ये तो गोलंदाजाने यष्टीजवळ (Stump) टाकलेला चेंडू शिताफीनं टोलवताना दिसत आहे. बाबरने टोलवलेला चेंडू यष्टिरक्षकाला (Wicket-keeper) चकवून मागे जात आहे. या व्हिडीओच्या पुढील भागात बाबर आझम क्रिकेटची हीच टेक्निक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरताना दिसतोय. विशेष म्हणजे फार ताकद न लावता तंत्रशुद्धपणे बाबरने तो चेंडू टोलवला आणि चौकारदेखील वसूल केला. हा व्हिडीओ पाहून कोणीही बाबर आझमच्या या नव्या शॉटचं (फटका) कौतुक करेल. रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरनेदेखील बाबरचं कौतुक केलं आहे. (Shoaib Akhtar Babar Azam,Shoaib Akhtar,Babar Azam,street smartness,Pakistan cricketer)

शोएबने म्हटलं आहे की, इनडोर क्रिकेट खेळताना बाबरने जो फटका मारला, अगदी तसाच शॉट तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येदेखील खेळतो. पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-20 सामन्यातील हा फटका आहे. घरात केलेला क्रिकेटचा सराव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसा फायद्याचा ठरतो, याचं उदाहरण बाबर आझमने दिलं असल्याचं शोएबनं म्हटलं आहे. शोएबने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ”गल्ली आणि घरात क्रिकेट खेळून पाकिस्तानी क्रिकेटपटू स्मार्ट झाले आहेत. गल्ली आणि घरात जोरदार फटका मारण्याएवढी जागा नसते. त्यामुळे नवनवीन शॉट्सचा शोध लावला जातो. बाबरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात यापैकीच एक उदाहरण दाखवलं.

लाहोरच्या गल्ल्यांमध्ये खेळणारा बाबर ICC च्या क्रमवारीत नंबर 1

आयसीसीने गेल्या आठवड्यात एकदिवसीय अर्थात वन डे रँकिंग (ODI Ranking) जाहीर केली आहे. ताज्या ICC रँकिंगनुसार टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पिछाडीवर पडला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आता जगातील नंबर 1 वन डे फलंदाज ठरला आहे. तर विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या स्थानी घसरला आहे. पाकिस्तानने नुकतंच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका 2-1 ने जिंकली होती. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात बाबर आझमने 94 धावांची जबरदस्त खेळी केली होती. त्यामुळे बाबर आझमच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे.

12 व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात

बाबर आझम लहानपणापासून गल्ली क्रिकेट खेळतच होता. वयाच्या 12 व्या वर्षी तो पहिल्यांदा सीझन बॉलने खेळला. मोठा क्रिकेटर होण्याचं स्वप्न बाळगणारा बाबर तेव्हा निराश झाला, जेव्हा त्याची 14 व्या वर्षीय नॅशनल क्रिकेट अकादमीत निवड झाली नाही.

मात्र त्याच्या पदरी आलेली ती पहिली आणि शेवटची निराशा ठरली. कारण पुढच्याच वर्षी म्हणजे वयाच्या 15 व्या वर्षी त्याला सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून गौरवण्यात आलं.

मागील वर्षी त्याने केवळ आणि केवळ सरावात घालवलं. दोन चुलत भावांसोबत सकाळी दहा वाजता घर सोडायचं ते रात्री 8 वाजताच परत यायचं. दिवसभर मैदानात प्रॅक्टिस करायचा.

अंडर 19 वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज कामगिरी 

बाबर आझमची पाकिस्तानच्या अंडर 19 वर्ल्डकप संघात निवड झाली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सलामीला येऊन बाबरने 129 धावा ठोकल्या. विश्वचषकाच्या सर्वा सामन्यात त्याने 59.60 च्या सरासरीने 298 धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या नंबरवर होता. या यादीत ज्यो रुट, बेन स्टोक आणि के एल राहुल त्याच्या पुढे होते.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका

बाबर आझमने पुढे देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका केला. तो 15 व्या वर्षी लिस्ट ए तर 16 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला. पाकिस्तानच्या वन डे संघात निवड होण्यापूर्वी त्याने 6 शतकं झळकावली होती. 31 मे 2015 रोजी त्याला पाकिस्तानच्या वन डे संघात स्थान मिळालं. वन डे क्रिकेटमध्ये बाबर आझमने पाकिस्तानकडून खेळताना मोठमोठ्या खेळी केल्या.

बाबर आझमची कामगिरी

26 वर्षीय बाबर आझम उजव्या हाताने फलंदाजी करतो. 80 वन डे सामन्यात त्याने 13 शतकं आणि 17 अर्धशतकं झळकावली आहेत. वन डेमध्ये त्याने 3808 धावा केल्या आहेत. दुसरीकडे कसोटीमध्ये 31 सामन्यात 5 शतकं आणि 16 अर्धशतकं ठोकली आहेत. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 2167 धावा आहेत.

संबंधित बातम्या 

Icc Odi Player Ranking | बाबर आझमची गरुड भरारी, विराट कोहलीला पछाडत पटकावलं पहिलं स्थान

IPL 2021: आंद्रे रसेलने भर मैदानात एकदा नाही तर तब्बल पाचवेळा हरभजन सिंहची केली ‘बेइज्जती’, कारण वाचून हैराण व्हाल

(Shoaib Akhtar Babar Azam,Shoaib Akhtar,Babar Azam,street smartness,Pakistan cricketer)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.