World Cup 2023 : ‘2011 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमधील बदला घ्यायचाय त्यामुळे….’; शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य!
भारतामध्ये येत टीम इंडियाला पराभूत करणं काही खायची गोष्ट नाही. मात्र अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू आणि रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने एक मोठी भविष्यवाणी केली आहे.
मुंबई : यंदाचा वर्ल्डकप भारतामध्ये होणार आहे. 2011 च्या वर्ल्ड कपनंतर 2023 च्या वर्ल्डकपच्या यजमानपदासाठी बीसीसीआय सज्ज झाली आहे. भारतामध्ये वर्ल्ड कप होणार असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भारतामध्ये येत टीम इंडियाला पराभूत करणं काही खायची गोष्ट नाही. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू आणि रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने एक मोठी भविष्यवाणी केली आहे.
2011 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सेमी फायनल सामन्यामध्ये पकिस्तान संघाचा पराभव केला होता. आता पाकिस्तान याचा बदला 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्ये हरवून पूर्ण करणार आहे. कारण यंदाच्या वर्ल्डकपचा फायनल सामना भारत-पाकमध्ये होणार असल्याचं शोएब अख्तरने म्हटलं आहे.
शोएब अख्तर अनेकवेळा आपली मत मांडतो त्यानंतर त्याच्यावर भारतीय क्रिकेट चाहते जोरदार टीका करताना दिसतात. आता त्याच्या म्हणण्यानुसार भारत आणि पाक या दोन संघांमध्ये वर्ल्ड कपचा फायनल सामना होणार. इतकंच नाहीतर त्यामध्ये पाकिस्तान भारताचा पराभव करणार कारण 2011 च्या सेमी फायनलमध्ये झालेला बदला घ्यायचा असल्याचं त्याचंं म्हणणं आहे.
दरम्यान, शोएब अख्तरने त्याच्या कारकिर्दीत पाकिस्तानसाठी एकूण 46 कसोटी, 163 एकदिवसीय आणि 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 82 डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने 25.7 च्या सरासरीने 178 विकेट्स घेतल्या आहेत. 162 एकदिवसीय डावात गोलंदाजी करताना अख्तरने 24.98 च्या सरासरीने एकूण 247 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 15 डावांमध्ये त्याने गोलंदाजी करताना एकूण 19 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलचे एकूण 3 सामने खेळले असून त्याने 10.8 च्या सरासरीने 5 बळी घेतले आहेत.