IPL 2022, DC vs RR, Playing 11 : थोड्याच वेळात राजस्थान विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना, पाहा दोन्ही संघाचे प्लेइंग इलेवन
आयपीेएलमधील राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा सामना थोड्याच वेळात वानखेडे स्टेडियमवर सामना सुरु होणार आहे. पाहा दोन्ही संघाचे प्लेइंग इलेवन
मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या हंगामातील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium Mumbai) थोड्यात वेळात सामना होत आहे. दोन्ही संघांमध्ये बरोबरीची स्पर्धा आहे. या सामन्यात दोन्ही संघातील उपस्थित जादूगारांवर प्रामुख्याने नजर असेल. गेल्या सामन्यात हॅटट्रिक करणारा युझवेंद्र चहल या मोसमात 17 बळी घेऊन डोक्यावर जांभळ्या रंगाची टोपी घातला आहे. तर मनगटाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव 13 बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या पाच वर्षात ‘कुल चा’ ने खूप चढ-उतार पाहिले आहेत. चहलला गेल्या टी-20 विश्वचषकाच्या संघातून वगळण्यात आले होते. तर कुलदीपही खराब फॉर्ममुळे बाहेर होता. कुलदीप व्यतिरिक्त दिल्लीकडे अक्षर पटेल आणि ललित यादव देखील आहेत जे त्यांच्या फिरकीने विरोधी फलंदाजांना लगाम घालण्यात यशस्वी ठरत आहेत. हे तिघेही राजस्थानच्या फलंदाजांची धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करतील.
दोन्ही संघांमध्ये बरोबरीची स्पर्धा
बटलरचा सलामीचा जोडीदार देवदत्त पडिक्कलने गेल्या सामन्यात काही आकर्षक शॉट्स खेळले. त्यांना त्यात आणखी सुधारणा करायची आहे. या दोघांना सुरुवातीच्या षटकांमध्ये खलील अहमद, मुस्तफिझूर रहमान आणि शार्दुल ठाकूर यांच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागणार आहे. दोन्ही संघांमध्ये बरोबरीची स्पर्धा आहे. राजस्थानने त्यांच्या शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर सात धावांनी विजय मिळवला होता. दोन्ही संघांमधील स्पर्धा आतापर्यंत बरोबरीची राहिली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष असणार आहे.
दोन्ही संघाचे प्लेईंग इलेवन
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसीद कृष्णा, ओबेद मॅककॉय, युझवेंद्र चहल
दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (कर्णधार), रोवमन पॉवेल, ललित यादव, सरफराज खान, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद
राजस्थानच्या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न होईल
गेल्या सामन्यात हॅटट्रिक करणारा युझवेंद्र चहल या मोसमात 17 बळी घेऊन डोक्यावर जांभळ्या रंगाची टोपी घातला आहे. तर मनगटाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव 13 बळींसह दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या पाच वर्षात ‘कुल चा’ ने खूप चढ-उतार पाहिले आहेत. चहलला गेल्या टी-20 विश्वचषकाच्या संघातून वगळण्यात आले होते. तर कुलदीपही खराब फॉर्ममुळे बाहेर होता. कुलदीप व्यतिरिक्त दिल्लीकडे अक्षर पटेल आणि ललित यादव देखील आहेत जे त्यांच्या फिरकीने विरोधी फलंदाजांना लगाम घालण्यात यशस्वी ठरत आहेत. हे तिघेही राजस्थानच्या फलंदाजांची धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करतील.
इतर बातम्या