श्रेयसची टी20 क्रिकेट स्पर्धेत कमाल! हॅटट्रीकमध्ये पांड्या ब्रदर्स जाळ्यात

सैयद मुश्ताक अली टी20 क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरु आहे. देशांतर्गत टी20 स्पर्धेत दिग्गज खेळाडू मैदानात उतरले आहे. आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वीची रंगीत तालिम असल्याचं बोललं जात आहे. आता श्रेयस गोपाळने बरोडाविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रीक घेत आपला फॉर्म दाखवून दिला आहे.

श्रेयसची टी20 क्रिकेट स्पर्धेत कमाल! हॅटट्रीकमध्ये पांड्या ब्रदर्स जाळ्यात
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 6:05 PM

सैयद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत कर्नाटक आणि बरोडा हे संघ आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल कर्नाटकाच्या बाजूने लागला आणि कर्णधार मयंक अग्रवालने प्रथम फलंदाजी स्वीकारली. कर्नाटकने 20 षटकात 8 गडी गमवून 169 धावा केल्या आणि विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं. कर्नाटकडून अभिनव मनोहरने नाबाद 56 धावांची खेळी केली. 34 चेंडूंचा सामना करताना त्याने 6 षटकार मारले. बरोडाने हे आव्हान 18.5 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. 4 गडी राखून बरोडाने कर्नाटकावर विजय मिळवला. हे आव्हान गाठताना बरोडाला 13 धावांवर अभिमन्यू सिंग राजपूतच्या रुपाने पहिला धक्का बसला. फक्त 6 धावा करत तंबूत परतला. पण त्याने शशवत रावत आणि भानु पानिया यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी कर्नाटकासाठी डोकेदुखी ठरली होती. त्यामुळे ही जोडी फोडण्यासाठी श्रेयस गोपाळकडे चेंडू सोपवला. श्रेयस गोपाळने अपेक्षेप्रमाणे कामगिरी करून कर्नाटकाला सामन्यात आणत जीव ओतला. हॅटट्रीक घेत बरोड्याला बॅकफूटवर ढकललं. ही हॅटट्रीक काय साधीसूधी नव्हती. कारण पांड्या ब्रदर्सची विकेट यात सहभागी आहेत.

श्रेयस गोपाळ संघाचं 11वं षटक टाकण्यासाठी आला होता. पहिल्याच चेंडूवर त्याने शशवात रावतची विकेट काढली. 63 धावांवर खेळत असताना मनिष पांडेच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा हार्दिक पांड्या उतरला. आतापर्यंत हार्दिक पांड्याची कामगिरी तडकेबंद राहिली आहे. त्यामुळे अपेक्षित कामगिरी करेल असं वाटत होतं. पण पहिल्याच चेंडूवर श्रेयस गोपाळने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर हॅटट्रीक बॉलचा सामना करण्यासाठी कृणाल पांड्या समोर होता. त्यामुळे हॅटट्रीक काय सहज मिळणार हे वाटलं होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. पहिल्याच चेंडूवर कृणाल पांड्या बाद झाला आणि श्रेयस गोपाळच्या नावावर हॅटट्रीकची नोंद झाली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

कर्नाटक (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल (कर्णधार), मनीष पांडे, कृष्णन श्रीजीथ (विकेटकीपर), स्मरण रविचंद्रन, अभिनव मनोहर, श्रेयस गोपाल, शुभांग हेगडे, मनोज भंडागे, वासुकी कौशिक, विजयकुमार विशक, विद्याधर पाटील.

बडोदा (प्लेइंग इलेव्हन): महेश पिठिया, शाश्वत रावत, अभिमन्यू सिंग राजपूत, शिवालिक शर्मा, भानू पानिया, क्रुणाल पांड्या (कर्णधार), हार्दिक पंड्या, विष्णू सोलंकी (विकेटकीपर), अतित शेठ, आकाश महाराज सिंग, लुकमान मेरीवाला.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.