Shreyas Iyer | श्रेयस अय्यर चमकला, श्रीलंका विरुद्ध मोठा रेकॉर्ड
Shreyas Iyer | श्रेयस अय्यर याला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याचा अपवाद वगळता विशेष काही योगदान देता आलं नाही. मात्र त्यानंतर श्रेयसने श्रीलंका विरुद्ध 82 धावांची खेळी करत भरपाई केली आहे.
मुंबई | टीम इंडियाचा बॅट्समन श्रेयस अय्यर याला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये श्रीलंका विरुद्ध सूर गवसलाय. श्रेयसने आपल्या होम ग्राउंड अर्थात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये तोडफोड बॅटिंग केली. शुबमन आणि विराट या दोघांना शतकाची संधी होती. मात्र शुबमन गिल 92 आणि विराट 88 धावांवर आऊट झाले. मात्र त्यानंतर अखेरीस श्रेयसने दे दणादण फटकेबाजी केली. श्रेयसलाही शतकाची संधी होती. मात्र श्रेयसही शतक ठोकण्यात अपयशी ठरला. पण श्रेयसने 82 धावांची झंझावाती खेळी केली. श्रेयसने केलेल्या या फटेकबाजीमुळे टीम इंडियाला 350 पार मजल मारता आली.
श्रेयसने 56 बॉलमध्ये 3 चौकार आणि 6 सिक्सच्या मदतीने 82 धावा केल्या. श्रेयसने या खेळी दरम्यान मोठा रेकॉर्ड केला. श्रेयस टीम इंडियाकडून अशी कामगिरी करणारा तिसराच फलंदाज ठरला. श्रेयस वनडे क्रिकेटमध्ये वेगवान 2 हजार धावा करणारा तिसरा भारतीय ठरला. श्रेयसने 65 धावा पूर्ण करताच हा विक्रम आपल्या नावावर केला. श्रेयसच्या आधी टीम इंडियाकडून शुबमन गिल आणि शिखर धवन या दोघांनीच ही कामगिरी केली आहे.
वेगवान 2 हजार धावा करणारे भारतीय
शुबमन गिल – 38 डाव.
शिखर धवन – 48 डाव.
श्रेयस अय्यर 49 डाव.
नवज्योज सिंह सिद्धू – 52 डाव.
श्रीलंकासमोर 358 धावांचं आव्हान
दरम्यान टीम इंडियाने श्रीलंकासमोर 358 धावांचं आव्हान ठेवलंय. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 357 धावा केल्या. शुबमन, विराट, श्रेयस व्यतिरिक्त टीम इंडियाकडून रविंद्र जडेजा याने 35, केएल राहुल याने 21, सूर्यकुमार यादव याने 12 धावांचं योगदान दिलं. मात्र रोहित शर्मा आपल्या घरच्या मैदानात 4 धावा करुन आऊट झाला. तर मोहम्मद शमी याने 2 आणि जसप्रीत बुमराह याने नाबाद 1 धाव केली.
श्रेयस अय्यरचा धमाका
Fewest innings to complete 2000 ODI runs for India.
‣ Shubman Gill – 38 ‣ Shikhar Dhawan – 48 ‣ Shreyas Iyer* – 49 ‣ Navjot Sidhu – 52#ShreyasIyer #INDvsSL #CWC23 pic.twitter.com/hhrU5cjVUL
— Ishan Joshi (@ishanjoshii) November 2, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसुन रजिथा, दुष्मंथा चमीरा आणि दिलशान मदुशंका.