3 सामने, सलग 3 अर्धशतकं, नाबाद 204 धावा, तरीही श्रेयस अय्यर संघाबाहेर होणार!

दुखापतीतून सावरुन भारतीय संघात कमबॅक करणाऱ्या श्रेयस अय्यरने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपले मोठेपण दाखवून दिले आहे. वनडे असो किंवा टी-20, प्रत्येक फॉरमॅटमध्ये तो आश्वासक फलंदाज आहे. श्रेयस अय्यरने टीम मॅनेजमेंटला दाखवून दिले आहे की त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळणे सोपे नाही.

3 सामने, सलग 3 अर्धशतकं, नाबाद 204 धावा, तरीही श्रेयस अय्यर संघाबाहेर होणार!
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत श्रेयसने प्रतिस्पर्धी संघाला आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. Image Credit source: INSTAGRAM
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 4:56 PM

मुंबई : श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत श्रेयसने प्रतिस्पर्धी संघाला आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. त्याने सलग तीन अर्धशतक झळकवली. श्रेयसच्या या कामगिरीमुळे टीम मॅनेजमेंटसमोर संघ निवडीचा पेच वाढणार आहे. खरंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि संघ व्यवस्थापनही T-20 वर्ल्डकपसाठी संघ निवड करताना अशा प्रकारच्या डोकेदुखीमुळे आनंदी असेल. श्रेयसने श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Sri Lanka) पहिल्या टी 20 मध्ये 57, दुसऱ्या सामन्यात 74 आणि तिसऱ्या सामन्यात 73 धावांची खेळी केली. तिन्ही सामन्यात तो नाबाद राहिला. आक्रमकतेबरोबरच परिस्थिती ओळखून खेळण्याचं भानही श्रेयसच्या फलंदाजीत दिसून आलं. विराटच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली, त्याचा श्रेयसने पुरेपूर फायदा उचलला. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव संघात परतल्यानंतर श्रेयसने कुठल्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असा पेच सर्वांना पडला आहे.

दुखापतीतून सावरुन भारतीय संघात कमबॅक करणाऱ्या श्रेयस अय्यरने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपले मोठेपण दाखवून दिले आहे. वनडे असो किंवा टी-20, प्रत्येक फॉरमॅटमध्ये तो आश्वासक फलंदाज आहे. श्रेयस अय्यरने टीम मॅनेजमेंटला दाखवून दिले आहे की त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळणे इतके सोपे नाही पण तरीही कदाचित या फलंदाजाला निराश व्हावे लागेल.

तुम्ही विचार करत असाल की, 3 टी-20 सामन्यात 204 धावा करणाऱ्या या फलंदाजाला निराश का व्हावे लागेल? श्रेयस अय्यरमध्ये काहीच कमी नाही. त्याच्याकडे बचावापासून ते आक्रमणापर्यंतचे विविध फटके आहेत. त्याच्याकडे शॉट्सचा खजिना आहे ज्यामुळे तो एक धोकादायक T20 खेळाडू बनतो परंतु या खेळाडूच्या निराशेचे कारण म्हणजे त्याचा फलंदाजी क्रम.

फलंदाजी क्रम चिंतेचा विषय

श्रीलंकेविरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला. विराट कोहली या क्रमांकावर फलंदाजी करतो. म्हणजेच विराट कोहली संघात परतल्यानंतर श्रेयस अय्यरला तिसरा क्रमांक सोडावा लागेल. त्यामुळे आता श्रेयस अय्यर कुठे फलंदाजी करणार हा प्रश्न आहे. कारण टीम इंडिया मॅनेजमेंटच्या नव्या थिंक टँकनुसार ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर आणि सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर असेल. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर व्यंकटेश अय्यर आणि रवींद्र जडेजासारखे खेळाडू असतील.

सूर्यकुमारला प्लेईंग इलेव्हनमधून वगळता येणार नाही

श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर खेळत नसेल, तर त्याची थेट स्पर्धा सूर्यकुमार यादवशी आहे, ज्याला टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्याचा विचारही करणार नाही. सूर्यकुमार यादवने अवघ्या 14 T20 सामन्यांमध्ये आपल्या दमदार कामगिरीने प्रत्येक परिस्थितीत सर्वोत्तम स्ट्राइक रेटने धावा चोपल्या आहेत. सूर्यकुमारने 39 च्या सरासरीने 351 धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट 165 पेक्षा जास्त आहे. मधल्या फळीत असा जबरदस्त स्ट्राईक रेट आणि मॅचविनिंग क्षमता असलेल्या खेळाडू प्रत्येक संघाला हवा असतो.

श्रेयसची धमाकेदार आकडेवारी

श्रेयस अय्यरने 36 टी-20 सामन्यांमध्ये 36.77 च्या सरासरीने 809 धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राइक रेट देखील 140 च्या पुढे आहे. हे आकडे T20 क्रिकेटमध्ये अतुलनीय आहेत पण मुद्दा असा येतो की इथे दोष अय्यरच्या आकडेवारीचा किंवा कामगिरीचा नसून त्याच्या फलंदाजीच्या क्रमाचा आहे. श्रेयस अय्यरने कितीही चांगली कामगिरी केली तरी त्याच्याकडे विराट कोहलीचा पर्याय म्हणून पाहता येणार नाही, असं मत माजी माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल याने व्यक्त केलं आहे. क्रिकबझशी संवाद साधताना पार्थिव म्हणाला की, “जेव्हा तुम्ही विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवसारख्या खेळाडूंशी स्पर्धा करता तेव्हा अशी कामगिरी करावीच लागेल. मात्र, पुनरागमनानंतर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर दिसणार आहे. चांगली कामगिरी करणे श्रेयस अय्यरच्या हातात आहे. संघ व्यवस्थापन त्याला कुठे, कोणत्या क्रमांकावर आणि कोणत्या सामन्यात संधी देईल, हे त्याच्या हातात नाही. कदाचित श्रेयस अय्यरही असाच विचार करत असावा.”

इतर बातम्या

IND vs SL: ‘गवताला पाणी मिळाल नाही की…’ चहलने आपल्याच मित्राला कॅमेऱ्यासमोर केलं ट्रोल, पहा VIDEO

Mohammed Shami on Trolling: ‘ते खरे भारतीय नाहीत’, धर्मावरुन ट्रोलिंग करणाऱ्यांना मोहम्मद शमीचं सडेतोड उत्तर

IND vs SL: T 20 मध्ये रोहित शर्माला ‘या’ श्रीलंकन गोलंदाजाने बनवलय खेळणं, हवं तेव्हा करतो आऊट

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.