IND vs AUS : अर्रर…! श्रेयस अय्यर याला नेमकं झालं तरी काय? अशी चूक वर्ल्डकपमध्ये पडणार महागात Watch Video

IND vs AUS, 1st ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना सुरु आहे. हा सामना वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी लिटमस टेस्ट आहे. त्यामुळे चुका खेळाडूंना महागात पडू शकते. अशीच एक चूक श्रेयस अय्यरने केली आहे.

IND vs AUS : अर्रर...! श्रेयस अय्यर याला नेमकं झालं तरी काय? अशी चूक वर्ल्डकपमध्ये पडणार महागात Watch Video
IND vs AUS : श्रेयस अय्यर याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात केली मोठी चूक, शार्दुल ठाकुर संतापला Watch Video
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 2:51 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना सुरु आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने दोन्ही खेळाडूंसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. त्यामुळे खेळाडूंना चांगलं प्रदर्शन करून आत्मविश्वासाने वर्ल्डकप स्पर्धेत उतरावं लागणार आहे. कारण या मालिकेतील खेळाडूंच्या प्रदर्शनावर त्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. कारण या मालिकेतील प्रदर्शनावर काही खेळाडूंची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. कारण संघ बदलण्याची अंतिम मुभा 28 सप्टेंबरपर्यंत आहे. तसेच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मालिका 27 सप्टेंबरला संपत आहे. त्यामुळे खेळाडूंचं आकलन आणि फॉर्म पाहून संधी द्यायची की नाही हे ठरणार आहे. अशात खेळाडूंना एखादी चूक चांगलीच महागात पडू शकते. श्रेयस अय्यर याच्या हातून अशीच एक चूक झाली आहे. पाटा पिचवर विकेट मिळणं कठीण असताना श्रेयस अय्यरने कॅच सोडली.

श्रेयस अय्यरने असा झेल सोडला

कर्णधार केएल राहुल याने संघाचं नववं षटक शार्दुल ठाकुर याला सोपवलं. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वॉर्नर चौकार मारला. त्यानंतर शार्दुलने कमबॅक करत दोन चेंडू निर्धाव टाकले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर पुन्हा चौकार आला. कमबॅक करत पाचवा चेंडू निर्धाव टाकला आणि सहाव्या चेंडूवर अपेक्षित टप्पा टाकत थेट श्रेयस अय्यरच्या हाती चेंडू गेला. पण श्रेयस अय्यरने कॅच ड्रॉप केला. याची नाराजी शार्दुल ठाकुरच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

श्रेयस अय्यरने वॉर्नरचा कॅच सोडला तेव्हा वॉर्नर फक्त 14 धावांवर होता. तसेच ऑस्ट्रेलियाच्या 1 बाद 40 धावा होत्या. वॉर्नरची विकेट गेली असती तर संघावर दडपण वाढलं असतं. पण कॅच सोडल्याने वॉर्नरला आणखी एक संधी मिळाली. त्याने भारताविरुद्ध अर्धशतकी खेळी केली. पाटा विकेट असल्याने संघाच्या धावा 300 च्या वर होण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲडम झम्पा

भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, विकेटकीपर) इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.