Shreyas Iyer : फिटनेस की फॉर्म? श्रेयस अय्यर भारतीय संघातून आऊट, कोणाला मिळणार संधी?

इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यातून श्रेयस अय्यरला वगळण्यात आलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. श्रेयर अय्यरला संघातून ड्रॉप करण्याचं खरं कारण काय? असा प्रश्न पडला आहे. त्याच्याऐवजी आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळेल? हे पाहणं देखील औत्सुक्याचं असणार आहे.

Shreyas Iyer : फिटनेस की फॉर्म? श्रेयस अय्यर भारतीय संघातून आऊट, कोणाला मिळणार संधी?
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरला उर्वरित तीन कसोटीतून मिळाला डच्चू, या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळणार स्थान
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 1:03 PM

मुंबई : आज उद्या करता करता बीसीसीआयने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चार दिवस आधी संघाची घोषणा केली आहे. या संघातून दोन गोष्टी प्रामुख्याने अधोरेखित होत आहेत. एक तर विराट कोहली या संपूर्ण कसोटी सामन्यात खेळणार नाही. वैयक्तिक कारणास्तव हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरं, श्रेयस अय्यर उर्वरित तीन सामन्यातून डच्चू देण्यात आला आहे. श्रेयस अय्यरला संघात स्थान न देण्याचं कारण बीसीसीआयने स्पष्ट केलेलं नाही. पण संघ निवडीपूर्वी त्याने फॉरवर्ड डिफेन्स शॉट्स खेळताना पाठिची दुखापत जाणवत असल्याचं सांगितलं होतं. शस्त्रक्रियेनंतर श्रेयसला पहिल्यांदाच अशा समस्येला समोरं जावं लागलं आहे. त्यामुळे त्या काही आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. पण बीसीसीआयने अय्यरच्या दुखापतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे अय्यरला नेमकं कोणत्या कारणासाठी वगळण्यात आलं याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दुखापतीमुळे की खराब फॉर्ममुळे डच्चू दिला असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरची कामगिरी निराशाजनक राहिली. हैदराबाद कसोटी भारताला 28 धावांनी गमवावी लागली होती. या सामन्याच्या दोन डावात 35 आणि 13 धावा केल्या होत्या. या सामन्यात त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. पण भ्रमनिरास झाला. विशाखापट्टणममध्येही अय्यर मोठी खेळी करण्यात अपयशी टरला होता. पहिल्या डावात 27 धावा आणि दुसऱ्या डावात 29 धावांची खेळी केली होती. यावेळी फिरकीपटूंसमोर अय्यर संघर्ष करताना दिसला.

श्रेयस अय्यर मागच्या दोन वर्षांपासून कसोटी चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. या वर्षीही खेळलेल्या तीन कसोटी सामन्यात त्याने 21.60 च्या सरासरीने धावा केल्या. तर 2023 मध्ये चार कसोटीत 13.16 च्या सरासरीने धावा केल्या. त्यामुळे श्रेयस अय्यरची जागा सरफराज खान घेण्याची दाट शक्यता आहे. दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माने श्रेयस अय्यरवर विश्वास दाखवला होता. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात सरफराज खानला संधी मिळू शकते.

इंग्लंड विरुद्ध अंतिम तीन सामन्यासाठी संघ

संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.